मुलांना जन्म द्या, पैसे कमवा; सरकारची अनोखी योजना

सहसा नागरिकांच्या हितासाठी देशातील सरकार विविध योजना राबवत असतं असं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. पण, नागरिकांच्या हितासोबतच देशहितही केंद्रस्थानी ठेवत जगाच्या पाठीवर असणाऱ्या एका देशानं एक वेगळीच योजना राबवली आहे. 

Dec 13, 2022, 15:25 PM IST

सहसा नागरिकांच्या हितासाठी देशातील सरकार विविध योजना राबवत असतं असं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. पण, नागरिकांच्या हितासोबतच देशहितही केंद्रस्थानी ठेवत जगाच्या पाठीवर असणाऱ्या एका देशानं एक वेगळीच योजना राबवली आहे. 

1/5

Japan paying people to boost Low Birth Rate in the country

देशातील जन्मदरात होणारी घट पाहता आर्थिक मोबदल्याची हमी देश सध्या नागरिकांना मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. मुलाच्या जन्मानंतर या देशात पालकांना शासनाकडून 4,20,000 येन (2,53,338 रुपये) इतकी रक्कम देण्यात येत आहे.   

2/5

Japan paying people to boost Low Birth Rate in the country

आता चलन पाहता तुमच्या हा देश कोणता ते लक्षात आलंच असेल. अगदी बरोबर ओळखलंत. हा देश आहे, जपान. स्वास्थ्य, श्रम आणि कल्याण मंत्री कात्सुनोबु काटो यांनी या रकमेचा आकडा वाढवून  500,000 येन (3,00,402 रुपये) इतका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सदर मुद्द्यावर अपेक्षित चर्चा झाली असून, 2023 च्या आर्थिक वर्षात यासाठी स्वीकृतीसुद्धा मिळू शकते. (Japan paying people to boost Low Birth Rate in the country )

3/5

Japan paying people to boost Low Birth Rate in the country

बरं, शासनानं ही रक्कम वाढवली तरी जपानमध्ये बाळाच्या जन्मानंतर ते घरी येईपर्यंत पालकांच्या खिशात 30,000 येन इतकीच रक्कम उरेल. जी अत्यंत किरकोळ आहे. 

4/5

Japan paying people to boost Low Birth Rate in the country

2021 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार जपानमध्ये एका पिढीहूनही कमी मुलांचा जन्म झाला. हा आकडा हादरवणारा होता, कारण याचे थेट परिणाम भविष्यावर होणार होते. 

5/5

Japan paying people to boost Low Birth Rate in the country

रॉयटर्सच्या माहितीनुसार मागील वर्षी देशात 8,11,604 बालकांचा जन्म झाला तर, 14,39,809 जणांचा मृत्यू झाला. ज्यामुळं लोकसंख्येमध्ये  6,28,205 इतक्या फरकानं घट झाली. ही बाब अत्यंत चिंतेची ठरत आहे.