PHOTO: महाराष्ट्रातील नवलाख पायरीचा जेजुरी गड; खंडेरायच्या मंदिरासह अनेक स्पॉट आहेत खूपच सुंदर

Jejuri Fort in Maharashtra, Khandoba Temple: खंडेरायाच्या जेजुरी संपूर्ण इतिहास फारच रंजक आहे. येथे आल्यावर सर्वत्र खंडेरायाची महिमा ऐकायला मिळते. यासह येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात. तीर्थक्षेत्र जेजुरी (jejuri) हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जेजुरीत  महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे मंदिर आहे.  हजारो भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. जेजुरीला कसं जायचं? जेजुरीत आल्यावर खंडेराच्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर कसं जायचं?  जेजुरी गडावर नेमकं कुठे  आहे खंडेरायाचे मंदिर.

| May 28, 2024, 10:50 AM IST
1/8

जेजुरी हे पुण्याच्या उत्तरेस 48 किलोमीटरवर आहे. तर, सोलापूरच्या दक्षिणेस 60 किलोमीटर अंतरावर आहे.  

2/8

जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदीर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे.   दीपमाळा हे याचे प्रमुख आकर्षण आहे.   

3/8

कडेपठारावरुन संपूर्ण जेजुरीचा निसर्गरम्य परिसर पहायला मिळतो. गडावरुन दिसणारे निसर्ग सौंदर्यपाहून मन प्रसन्न होते.

4/8

कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.  

5/8

देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो.

6/8

देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो.

7/8

सुमारे 200 पाय-या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पाय-या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. गडावर असलेले खंडेरायचे देऊळ अतिशय सुंदर आहे.

8/8

उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे.