मुंबईकरांचा आता गारेगार प्रवास, मुबंईत धावणार इलेक्ट्रीक डबलडेकर बस, पाहा किती आहे दर

मेधा कुचिक, झी मराठी, मुंबई : मुंबईत डबल डेकरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने एक गारेगार गिफ्ट दिलं आहे. आजपासून मुंबईत एसी डबल डेकर बसेस धावणार आहेत. बेस्ट प्रशासनाचे व्यवस्थापक लोकेश चंद्रा यांच्या हस्ते बसेसचे आज लोकार्पण करण्यात आलं. सध्या 200 एसी डबल डेकर बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. विशेष म्हणजे भारतातील ही पहिली एसी डबल डेकर बस सेवा ठरली आहे. सध्या कुर्ला ते बीकेसी मार्गावर या बसेस धावणार असून प्रतिसाद पाहून इतर मार्गांवर या बसेस नंतर सुरू करण्यात येणार आहेत.

Feb 13, 2023, 17:48 PM IST
1/5

पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात 7 वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस आहेत. एकूण 65 आसनव्यवस्था असलेली ही डबल डेकर बस आहे.

2/5

सध्या दोनच बस मुंबईकरांच्या सेवेत येणार असून पुढच्या आठवड्यापर्यंत आणखी 7 ते 8 बस सेवेत येतील. तसंच मार्चअखेर 200 एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होतील. 

3/5

या बसचं तिकिट सर्वसामान्यांना परवडेल असं आहे. या वातानुकुलित बसचं कमीतकमी तिकिट 6 रुपये आहे. स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून देखील तिकीट काढता येणार

4/5

या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा आहे. पुढे आणि मागे असे दोन स्वयंचलित दरवाजे या बसला आहेत. ही संपूर्ण वातानुकूलित अशी बस आहे. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पुढे आणि मागे असे दोन जिने आहेत

5/5

बसची 9 मीटर लांबी असल्याने बसच्या आतील भागात प्रशस्त अशी जागा. एका बसची किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे. 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 100 किमी धावण्याची क्षमता आहे. तर 80 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 250 किमी बस धावेल.