हेच 'ते' अभिनेते ज्यांनी 'Koffee With Karan 7' या शोमध्ये जाण्यास नकार दिलायं..

या शोमध्ये येण्यास स्पष्टपणे नकार देणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतच्या अनेक दिग्गज स्टार्सचा समावेश आहे.

Jul 07, 2022, 20:27 PM IST

Koffee With Karan 7 : करणला शोमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अनेकांना आवडत असतं. या शोमध्ये आल्यानंतर अनेक स्टार हे आणखी प्रसिद्ध होतात. असं असलं तरी, असे काही स्टार्स आहेत ज्यांनी या शोमध्ये येण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या यादीत बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतच्या अनेक दिग्गज स्टार्सचा समावेश आहे.

1/7

ज्युनिअर एनटीआर

दक्षिणेतील स्टार ज्युनियर एनटीआरने अलीकडेच 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.

2/7

राम चरण

करणचा शो 'कॉफी विथ करण' सुरू झाल्यापासूनच साऊथचा स्टार राम चरण या शोमध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात येत होतं, पण त्यानेही या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.

3/7

रणबीर कपूर

बॉलीवूड स्टार रणबीर कपूर देखील करणच्या शोमध्ये येणार नाही नसल्याचं समजतं आहे. त्याने नुकतंच त्याचं वैयक्तिक कारण देत शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.

4/7

यश

KGF 2 च्या रॉकी भाई म्हणजेच यशबद्दलही चर्चा होती की तो या शोमध्ये दिसणार आहे, पण आतापर्यंत यशने या शोमध्ये येण्यासाठी होकार दिला नसला तरी असं म्हटलं जातं की तो या शोमध्ये पाहालया मिळणार नाही.  

5/7

प्रभास

साऊथचा सुपरस्टार प्रभास याआधी करणच्या शोमध्ये दिसला होता, पण यावेळी तो देखील शोमध्ये दिसणार नाहीये.

6/7

कंगना राणौत

या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचंही नाव आहे. अलीकडेच, तिने करणच्या शोबद्दल पोस्ट केली आहे, परंतु ती सुद्धा या शोमध्ये दिसणार नाही.

7/7

आलिया आणि रणवीरची एन्ट्री

'कॉफी विथ करण 7' या शोचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आलिया आणि रणवीर सिंग दिसत आहेत. या दोन्ही शोमधून अनेक गुपितं उघड होणार आहेत.