शंख वाजवल्याने शरीररासंबंधी 'हे' आजार होतात दुर

जर तुम्हाला वाटत असेल की पूजेदरम्यान शंख वाजवल्यामुळे देव प्रसन्न होतो आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध राहतं, तर याव्यतिरिक्त याचे तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत.

Jul 07, 2022, 20:09 PM IST

शंखध्वनीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते आणि याचा केवळ धार्मिकच नाही तर मानसिक आणि शारीरिक प्रभावही दिसून आला आहे. चला जाणून घेऊया शंख वाजवल्याने शरीरावर काय परिणाम होतो.

1/6

स्नायू मजबूत होते

शंख फुंकल्याने शरीराच्या प्रत्येक भागाचे स्नायू मजबूत होतात. जर तुम्ही रोज शंख वाजवला तर तुमची नियंत्रण शक्ती वाढते.

2/6

श्वासोच्छवासाची समस्या दूर होते

शंख फुंकल्याने फुफ्फुसातील हवा बाहेर आत येत-जात राहते. यामुळे फुफ्फुसांना चांगला व्यायाम होतो आणि दमा, ऍलर्जी किंवा श्वासोच्छवासाच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.इतकेच नाही तर थायरॉईड ग्रंथी देखील अॅक्टिव्ह राहतात.

3/6

सुरकुत्या दूर होते, शायनिंग वाढते

तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर शंख वाजवा. शंख फुंकून चेहऱ्याचा व्यायाम केला जातो. यामुळे चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेला घट्टपणा आणि चमक येते.

4/6

कॅल्शियमची कमतरता दूर होते

शंख कॅल्शियमपासून बनलेला असतो आणि जर तुम्ही त्यात रात्रभर पाणी ठेवून ते प्यावे किंवा दुसऱ्या दिवशी मसाज केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते.

5/6

तणाव दूर होईल

शंख वाजवल्याने तणाव तर दूर होतोच पण चांगले हार्मोन्सही बाहेर पडू लागतात.  

6/6

शंख फुंकल्याने रक्तवाहिन्यांमधील अडथळे दुर होतात आणि हृदयविकारांसारखे धोके दूर होतात. (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)