महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते तुलना

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. 

Feb 04, 2024, 18:12 PM IST

Maharashtra Tourism Kalsubai Shikhar : माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. असेच एक उंच शिखर महाराष्ट्रात देखील आहे. हे शिखर  महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. हे शिखर सर करणं सोपं काम नाही. या शिखराचे नाव कळसुबाई असे आहे.

1/7

कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे. हे शिखर महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.  

2/7

 कळसुबाई या शिखरावरून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सुंदर अशी शिखरे, हरिश्चंद्रगड, रतनगड, अशी ठिकाणे पाहता येतात.  

3/7

 कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी बारी हे गाव आहे. मुंबई ते कळसूबाई 156 किमी,  पुणे ते कळसूबाई 170 किमी तर नाशिक ते कळसुबाई 60 किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्थानक  इगतपुरी हे आहे.   

4/7

कळसूबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर देखील आहे.

5/7

उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेत येणाऱ्या कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. 

6/7

कळसुबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे.   

7/7

प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये कळसुबाई शिखर नक्की असते. मात्र, हे शिखर सर करणं सोपं काम नाही.