अर्ध्या तासाचे अंतर 10 मिनिटांत पूर्ण होणार; कोस्टल रोडची पहिली झलक पाहा

मुंबईतील मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा 19 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होत आहे. कोस्टल रोडमुळं वाहतुक कोंडी कमी होणार आहे. या कोस्टल रोडची पहिली झलक पाहूयात. 

| Feb 04, 2024, 17:54 PM IST

Coastal Road Project: मुंबईतील मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा 19 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होत आहे. कोस्टल रोडमुळं वाहतुक कोंडी कमी होणार आहे. या कोस्टल रोडची पहिली झलक पाहूयात. 

1/7

अर्ध्या तासाचे अंतर 10 मिनिटांत पूर्ण होणार; कोस्टल रोडची पहिली झलक पाहा

Coastal Road Inauguration Marine Drive To Worli First Look

मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. लवकरच मुंबई महानगर पालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प कोस्टल रोड खुला होतोय. पाहूयात या पुलाचे वैशिष्ट्ये आणि पहिली झलक

2/7

Coastal Road Inauguration Marine Drive To Worli First Look

2018मध्ये 10.58 किमी लांबीच्या या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. कोस्टल रोडचा पहिला टप्पा चौपाटी ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत आहे. 

3/7

Coastal Road Inauguration Marine Drive To Worli First Look

या टप्प्यात दोन किमी लांबीचे संमातर बोगदे असणार आहेत. या बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या 30 मिनिटांचा वेळ लागतो मात्र या प्रकल्पासाठी 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागणार आहे. 

4/7

Coastal Road Inauguration Marine Drive To Worli First Look

कोस्टल रोडवर 8 लेन असतील ज्यावर 80 किमी प्रति तास इतकी वेगमर्यादा असेल. मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत कोस्टल रोड प्रकल्पांतर्गंत 12,721 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असते. 

5/7

Coastal Road Inauguration Marine Drive To Worli First Look

बोगदा पार करण्यासाठी फक्त तीन ते चार मिनिटांचाच वेळ लागणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते लवग्रोवपर्यंत कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आहे, लवग्रोव नाला ते वरळी सी लिंकपर्यंतचे तिसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. 

6/7

Coastal Road Inauguration Marine Drive To Worli First Look

मरीन ड्राइव्ह ते वांद्रे जाण्यासाठी 40 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र कोस्टल रोडमुळं हे अंतर फक्त 10 ते 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

7/7

Coastal Road Inauguration Marine Drive To Worli First Look

कोस्टल रोड खुला झाल्यानंतर 24 तास वाहने चालवण्याची परवानगी नाहीये, सकाळी ८ ते रात्री ८पर्यंत वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत प्रवास करु शकता. म्हणजेच 12 तासच या पुलाचा वापर करु शकता.