'पंगा क्विन' राजभवनावर...

Sep 13, 2020, 18:03 PM IST
1/5

कंगनाने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाने, 'मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबाबत राज्यपालांना सांगितलं' असं म्हटलंय. 

2/5

कंगना आणि राज्यपाल यांच्या भेटीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती. 

3/5

माझं भाग्य आहे की, राज्यपालांनी माझं म्हणणं आपल्या मुलीप्रमाणे ऐकून घेतलं, असंही ती म्हणाली.

4/5

'मला आशा आहे की, मला न्याय मिळेल. जेणेकरुन सर्व नागरिकांचा विशेषत: देशातील तरुण मुलींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत होईल', अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.

5/5

मुंबईने मला आतापर्यंत खूप काही दिलं आहे, आता न्यायही द्यावा, अशी मागणी कंगनाने केली आहे.