कपिल शर्माला नव्या शोसाठी मिळाली आलिशान व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटोज

Mar 03, 2018, 16:46 PM IST
1/6

विनोदाचा बादशहा अशी ओळख असलेला प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या कार्यक्रमासाठी कपिल जोरदार तयारी करत आहे आणि शो सुरु होण्यापूर्वी त्याने आपली नव्या व्हॅनिटी व्हॅनही तयार केली आहे.

2/6

कपिल शर्माने आपल्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत. फोटोज पाहून स्पष्ट दिसत आहे की, कपिलची नवी व्हॅनिटी व्हॅन खूपच लग्जरीयस आहे. ही व्हॅनिटी व्हॅन प्रसिद्ध डिझायनर दिलीप छाबडिया यांनी डिझाइन केली आहे.

3/6

द कपिल शर्मा शो बंद झाल्यानंतर कपिलच्या चाहते गोंधळात पडले होते. कपिल शर्मा नव्या शोमध्ये नेमकं काय करणार आहे हे त्याच्या चाहत्यांना कळत नव्हतं.

4/6

काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या नव्या शोचं नाव समोर आलं होतं. यावेळी कपिलच्या शोचं नाव 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' असं आहे. या शोचं प्रसारण सोनी टीव्हीवर होणार आहे.

5/6

या शोमध्ये कपिल पुन्हा एकदा स्टँडअप कॉमेडी करताना दिसणार आहे. या शोमध्ये कपिलला चंदन प्रभाकर साथ देणार आहे. तसेच किकू शारदा सुद्धा शोमध्ये दिसणार आहे.

6/6

हा शो मार्च महिन्यात ऑन एअर होणार आहे. या शोसाठी डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर्सचा टाईम स्लॉट देण्यात येणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: कपिल शर्मा/ इंस्टाग्राम)