PHOTO : डेब्यू चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, 'त्या' तरुणानं अनेक कलाकारांना बनवलं सुपरस्टार, आज आहे 1700 कोटींचा मालक

Karan Johar Net Worth : दिग्दर्शनापासून निर्मितीपासून अगदी काही चित्रपटात अभिनयदेखील केलं. त्याच्या चित्रपटातून अनेक कलाकार सुपरस्टार आहेत. 

May 25, 2024, 09:44 AM IST
1/7

26 वर्षांपासून इंडस्ट्रीत हा चिमुकला सक्रिय आहे. पहिल्याच डेब्यू चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. हा ग्लॅमर जगतातील एक यशस्वी सेलिब्रिटी आहे. लग्न न करता तो दोन मुलांचा बाप आहे. 

2/7

आम्ही बर्थडे बॉय करण जोहरबदद्ल बोलतोय. एचआर कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतल्यानंतर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' यातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

3/7

मग 2015 मध्ये अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेट त्याने काम केलं. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी दिग्दर्शनात एंट्री घेतली आणि त्याने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला. 

4/7

शाहरुख खान, राणी मुखर्जी, काजोल आणि सलमान खान या स्टार्ससोबतचा 'कुछ कुछ होता है'  ब्लॉकबस्ट हिट ठरला. करण जोहरने इंद्रधनुषमध्ये बालकलाकार म्हणून काम केलंय हे खूप कमी लोकांना माहितीय. 

5/7

वयाच्या या टप्प्यात करण जोहर अविवाहित आहे. पण त्याला दोन जुळी मुलं आहेत. त्याने लग्न न करण्याचे कारणही सांगितलंय. तो म्हणतो की, तो एक प्रॅक्टिकल व्यक्ती असून काम आणि नातेसंबंध सोडून इतर कोणालाही वेळ देऊ शकत नाही. तो स्वत:सोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि तो फक्त मुलांसाठी काहीही त्याग करु शकतो. 

6/7

एका मुलाखत करण जोहरने सांगितलं होतं की, त्याला ट्विकल खन्ना खूप आवडते. तर त्याचा बेडरुममध्ये शाहरुख खान आणि गौरी खानचा फोटो आहे. त्या दोघांकडे पाहून त्याला प्रेरणा मिळते. 

7/7

करण जोहर हा भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्मात्यांपैकी एक असून मीडिया रिपोर्टनुसार तो 1700 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहेत. एका जाहिरातीसाठी तो 2 कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय तो त्याच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या एका एपिसोडसाठी 1 ते 2 कोटी रुपये आकारतो. तर मुंबईत 32 कोटी रुपयांच घर आहे.