World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?
World Thyroid Day 2024 : एनआयएचनुसार, जगभरातील 42 दशलक्ष लोकांना थायरॉइडची समस्या असते. या आजाराबाबत जनजागृती निर्माण करावी यानिमित्ताने25 मे रोजी 'जागतिक थायरॉइड दिवस' साजरा केला जातो.
थायरॉइड हा आजार जुकीच्या जीवनशैलीशी संबंधित असा आजार आहे. जगभरात दशलक्षच्या घरात जवळपास थायरॉइड रुग्ण आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक थायरॉइडची समस्या जाणवते. थायरॉईड ही मानेतील फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही शरीरातील सर्वात मोठ्या अंतःस्रावी ग्रंथींपैकी एक आहे. थायरॉईड ग्रंथी शरीराच्या विविध भागांसाठी हार्मोन्स तयार करते. याशिवाय ही ग्रंथी चयापचय नियंत्रित करण्याचे काम करते.
आताच्या धकाधकीच्या जीवनात आहार, जीवनशैली आणि तणावामुळे थायरॉईडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'जागतिक थायरॉईड दिना'निमित्त या आजाराबाबत, कोणात आहार घ्यावा आणि कोणते पदार्थ टाळावेत हे पाहूया.