करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

Taimur and Jeh Rangoli: सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल आहे. त्यामुळे सेलिब्रेटींमध्येही दिवाळीचा उत्साह आहे. सध्या करीना कपूरनंही आपल्या दोन्ही मुलांसह दिवाळीचा सण साजरा केला. जेह आणि तैमुर यांनी यावेळी सुंदर अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

Nov 11, 2023, 21:05 PM IST

Taimur and Jeh Rangoli: सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल आहे. त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरीही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. यावेळी अभिनेत्री करीना कपूर हिच्या घरी देखील दिवाळीचा उत्साह होता. यावेळी तैमूर आणि जेह यांनी रांगोळी काढायला मदत केली आहे. सध्या त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

1/7

करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

jeh ali khan

सध्या दिवाळीचा उत्साह आहे. त्यानिमित्तानं सेलिब्रेटीही आपले दिवाळीचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. करीना कपूरच्या लाडक्या लेकांनीही यावेळी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. याचे फोटो करीनानं इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. 

2/7

करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

diwali celebration

करीना आपल्या लेकांसह अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा असते. सोबतच प्रत्येक नवनव्या गोष्टींमध्ये, कार्यक्रमात, सणासुदीला जेह आणि तैमुरही उत्साहानं भाग घेताना दिसतात.

3/7

करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

entertainment

करीना कपूर इन्स्टाग्रामवरून आपले आणि आपल्या कुटुंबियांचे फोटो हे शेअर करताना दिसते. नुकतीच त्यांनी राहा कपूरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचेही फोटो व्हायरल झाले होते. 

4/7

करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

taimur ali khan

तैमूर अली खानचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. म्हणता म्हणता तो आता 7 वर्षांचा झाला आहे. त्याचसोबत आता तो शाळेतही जाऊ लागला आहे. तर जेह 2 वर्षांचा आहे. 

5/7

करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

saif ali khan

2016 साली तैमूरचा जन्म झाला असून जेहचा जन्म 2021 साली झाला आहे. करीना कपूर खान हिनं आपल्या प्रेग्नंन्सीवरही आपल्या पुस्तकातून लिहिलं आहे आणि अनेक खुलासेही केले आहेत. 

6/7

करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

kareena kapoor news

करीना कपूर खानचा आगामी सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी या चित्रपटातून बॉलिवूडची मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तिचा या चित्रपटातील लुक व्हायरल झाला आहे. काही दिवसांपुर्वी तिचा पोस्टरही व्हायरल झाला होता. 

7/7

करीना कपूरच्या लाडक्या लेकांनी काढली रांगोळी; शेअर केले फोटो

kareena

सैफ अली खानचाही यावर्षी 'आदिपुरूष' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात तो रावणच्या भुमिकेतून दिसला होता. परंतु या चित्रपटावर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.