दिवाळीतील अभ्यंगस्नानाचा थेट संबंध आरोग्याशी, कोलेस्ट्रॉल-तणावापासून अशी होईल मुक्तता
Diwali Abhyanga snan Health Importance : दिवाळीत अभ्यंगस्नानाला अतिशय महत्त्व आहे. दिवाळीत पहिली आंघोळ ही फक्त परंपरा नाही तर यामागे दडलाय आरोग्यदायी फायदे.
भारतात हिंदु संस्कृतीचे महत्त्व अतिशय आहे. यामध्ये आयुर्वेदानुसार अनेक सणवार साजरे केले जातात. आयुर्वेद हे माणसाला निरोगी आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून देते. आपले अनेक सण वाराचे महत्त्व यामध्ये दडलेले आहे. आयुर्वेदातील वैज्ञानिक आधार हे आपल्या जीवन पद्धतीशी किंवा परंपरेशी सलग्न आहेत. असाच एक संस्कार म्हणजे 'अभ्ंयगस्नान'
'अभ्यंगस्नान'हा दिवाळीत केला जाणारा संस्कार आहे. अभ्यंग म्हणजे तेलाने केलेली मालिश, स्नान म्हणजे आंघोळ. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी ही पहिली आंघोळ केली जाते. ही आंघोळ फक्त त्या एका दिवसाला महत्त्व देत नाही तर याचे आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात.