Karnataka : इडली-डोसाचा नाश्ता आणि असा सुटला कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच...

राजीव कासले | May 18, 2023, 17:22 PM IST
1/5

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर आठवडभरानंतर निकाली लागला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्ब झालं आहे. तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री असणार आहेत. 

2/5

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला असून 'विजेता टीम' असं कॅप्शन फोटोला दिलं आहे. 

3/5

सोशल मीडियावर आणखी एक फोटो व्हायरल झाला असून यात सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार रणदीप सुरजेवाला यांच्याबरोबर नाश्ता करताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या तगडी चुरस होती. 

4/5

कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मुखमंत्री कोण होणार याची चांगलीच चर्चा रंगली होती. काँग्रेस हायकमांडकडूनही यावर निर्णय घ्यायला चार दिवसांचा अवधी गेला. या दरम्यान सिद्धरामय्या यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. 

5/5

आता सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x