समुद्र प्रवासाचा आनंद लुटा । मुंबई ते गोवा कर्णिका क्रूझचा लक्झरी प्रवास

Apr 23, 2019, 20:35 PM IST
1/6

सेव्हन स्टार हॉटेलची सुविधा या क्रूझवर उपलब्ध

सेव्हन स्टार हॉटेलची सुविधा या क्रूझवर उपलब्ध

पणजी, गोवा : भारतातले पहिले प्रीमियम क्रूझ आज गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर दाखल झाले. समुद्राच्या या प्रदेशात जेलेशचा एखाद्या महाराजासारखा थाट होता. ही जलेश. अर्थात कर्णिका. हे जहाज गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर थांबले आणि गोवेकरांची पावले कुतूहलाने जलेशकडे वळली. एक दिवसाआड हे जहाज मुंबई-गोवा आणि गोवा-मुंबई अशा फेऱ्या मारते. मुंबईमधून बॅलार्डपिअर इथल्या ग्रीन गेटवरुन सुटणारे हे जहाज १२ ते १५ तासांत गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर पोहोचते. या क्रूझच्या माध्यमातून तुम्ही एकदम लक्झरी प्रवास अनुभवू शकता. दोन हजार सातशे लोक एकाच वेळी या अलिशान जहाजावरुन प्रवास करु शकतात. सेव्हन स्टार हॉटेलची सुविधा या जहाजावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

2/6

मुंबई ते गोवा पहिला प्रवास

मुंबई ते गोवा पहिला प्रवास

कर्णिका क्रूझशीप आपल्या वेगवेगळ्या मार्गांविषयी माहिती देणार आहे. मुंबई-गोवा-मुंबई या मार्गावर ही सेवा सुरू झाली आहे. ही आकर्षक, सर्वोत्तम क्रूझशीप सेवा, मुंबई-चेन्नई, विशाखापट्टणम मार्गांवर देखील उपलब्ध असेल. कर्णिका क्रूझशीप देशीविदेशी पर्यटकांसाठी, सिंगापूर, दुबई आणि खाडी देशातील सर्वात आकर्षक शहरांमध्ये देखील सेवा देणार आहे. कर्णिका क्रूझशीप ही देशातील पर्यटन क्षेत्रातील नवं पाऊल असणार आहे. कारण भारतातील क्रूझ इंडस्ट्री वेगाने वाढत आहे.  

3/6

या जहाजातून समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येणार

या जहाजातून समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येणार

जागतिक दर्जाची भारतातील पहिली शानदार क्रूझशीप कर्णिका भारतात सुरू झाली आहे. जलेश क्रूझशीपची आंतरराष्ट्रीय पातळीवरील, कर्णिका ही क्रूझशीप १४ मजल्यांचा जणू समुद्रात तरंगणारा महल आहे. २ हजार ७०० प्रवासी क्षमतेसह कर्णिका क्रूजची लांबी २५० मीटर आहे. समुद्रात तरंगणारं हे क्रूझ 7-स्टार हॉटेलपेक्षाही अधिक आरामदायक, आणि विलक्षण वाटतं.  कर्णिका क्रूझचा बाहेरचा नजारा काही और आहे, एवढं शानदार दृश्य तुम्ही कधी पाहिलंच नसेल. या शानदार क्रूझमध्ये प्रवेश केल्यानंतर डोळे दिपावणारी दृश्य तुम्हाला दिसतील. चौदा मजल्याच्या कर्णिका क्रूझमध्ये प्रवेश करताना, जगातील सर्व सौंदर्यवान गोष्टी तुमच्यासमोर असल्याचा भास होतो. 

4/6

लवकरच गोव्यानंतर मुंबई, चेन्नई, विशाखापट्टनमवर सेवा सुरु होणार

लवकरच गोव्यानंतर मुंबई, चेन्नई, विशाखापट्टनमवर सेवा सुरु होणार

सध्या कर्णिका क्रूझ हे मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असे सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर हे लक्झरी क्रूझ लवकरच गोव्यानंतर मुंबई, चेन्नई, विशाखापट्टनमवर सेवा सुरु होणार आहे. कर्णिका क्रूझ हे विदेशातील पर्यटकांसाठी सिंगापूर, दुबई आणि खाडी देशांतमध्ये आकर्षक शहरात ही सेवा सुरु होणार आहे.  

5/6

क्रूझवर तुम्हाला शॉपिंगचा आनंदही लुटता येणार

क्रूझवर तुम्हाला शॉपिंगचा आनंदही लुटता येणार

क्रूझवर तुम्हाला शॉपिंगचा आनंदही लुटता येणार आहे तोही  24 तास. क्रूझमध्ये शॉपिंग करण्यासाठी शानदार शॉपिंग सुविधा उपलब्ध आहे. खूपच आकर्षक असलेल्या रेस्टॉरंटमध्ये देशी-विदेशी पर्यटकांच्या जिभेवर सतत चव रेंगाळेल असे मेन्यू आहेत. मनोरंजनासाठी क्रूझवर खास कॅसिनोची व्यवस्था केलेली आहे. समुद्रात तरंगणाऱ्या या कर्णिकात दोन मोठे स्विमिंग पूल देखील आहेत, ज्यात तुम्ही स्विमिंग करण्याचा अनुभव घेऊ शकतात. क्रूझमध्ये युवक आणि लहान मुलांच्या मनोरंजनाचा देखील विचार करण्यात आला आहे. मुलांसाठी असणारं वॉटरपार्क देखील खूपच आकर्षक आहे.  

6/6

कर्णिका क्रूझला पेटिंग आणि फोटोने सजवलेय

 कर्णिका क्रूझला पेटिंग आणि फोटोने सजवलेय

पर्पल आणि पिंकिश रंगाचं आकर्षक कर्निका क्रूझ अरब सागरात तरंगताना त्यात प्रवास करण्याचा अनुभव स्वर्गापेक्षा कमी नाही. कार्निका क्रूझशीप ही १४ मजल्यांची क्रूझ आहे. २ हजार ७०० प्रवासी क्षमतेसह कार्निका क्रूजची लांबी २५० मीटर आहे. या क्रूझला पाहून डोळे विस्फारतात, समुद्रात तरंगणारं हे क्रूझ, सेव्हन स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही. या क्रूजमध्ये पेटिंग आणि अनेक छायाचित्र पाहाय मिळणार आहेत. (सर्व छायाचित्र - Jalesh Cruises)