गुनीत मोंगा ते प्रेरणा अरोरा चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या महिला चित्रपट निर्मात्या

बॉलिवूडसारख्या पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत पाय रोवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण यातही एक निर्माती म्हणून स्वत: चं स्थान बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात गुनीत मोंगा, मीरा नायर, प्रेरणा अरोरा, अश्विनी अय्यर तिवारी आणि झोया अख्तर या चित्रपट महिला निर्मात्यांनी स्वत: चं या चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केलं आहे. 

| Mar 08, 2024, 16:32 PM IST
1/7

मीरा नायर

मीरा नायरला या सुरुवातीच्या काही महिला चित्रपटनिर्मात्यांपैकी एक होत्या,  ज्यांनी भारताला जागतिक पातळीवर नेऊन पोहचवलं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये सलाम बॉम्बे!, गोल्डन ग्लोब विजेता हिस्टेरिकल ब्लाइंडनेस, व्हॅनिटी फेअर, द नेमसेक, द रिलकंट फंडामेंटलिस्ट आणि 'द सुटेबल बॉय' या प्रोजेक्ट्स चा समावेश आहे.

2/7

गुनीत मोंगा

गुनीत मोंगानं चित्रपटांना वेगळा दर्जा निर्माण करून दिला आहे. गेल्या वर्षी तिनं ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटासाठी अकादमी पुरस्कार मिळवून भारताचा गौरव केला. गेल्या काही वर्षांत, गुनीतने ‘पेडलर्स’ मध्ये 2012, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फ्रँचायझी, ‘कथाल’ आणि तिनं बरेच काही उत्कृष्ठ प्रोजेक्ट्स केले आहेत.

3/7

प्रेरणा अरोरा

प्रेरणा अरोरा यांनी सामाजिक समस्या असलेल्या चित्रपटांना न्याय दिला. त्यांनी 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'रुस्तम', 'पॅडमॅन' आणि 'परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण' सारखे चित्रपट केले आहेत. त्यांचा आगामी प्रोजेक्ट हा दिव्या खोसला कुमार अभिनीत 'हिरो हिरोईन' आणि निधी अग्रवाल अभिनीत 'डंक' जे माफियांच्या समस्येवर प्रकाश टाकते.

4/7

अश्विनी अय्यर तिवारी

अश्विनीचे चित्रपट स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आहेत, जे चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात फारच दुर्मिळ आहे. कॉमेडी-ड्रामा 'निल बट्टे सन्नाटा' या तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणानंतर ती सर्वात जास्त मागणी असलेली दिग्दर्शक बनली. तिनं रोमँटिक कॉमेडी-ड्रामा बरेली की 'बर्फी'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवला.

5/7

2009 मध्ये झोयानं 'लक बाय चान्स'मधून पदार्पण केलं तेव्हा ती एक चित्रपट निर्माती बनली. ‘जिंदगी ना मिलेंगी दोबारा’ नंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. विविध प्रकल्पांमधून तिने कायम प्रेक्षकांना आपलंसं केलं.

6/7

चित्रपटसृष्टीत असलेल्या या महिलांनी या क्षेत्रात अप्रतिम कामगिरी केली आहे. या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची नेहमीच चर्चा होते. 

7/7

आज महिला दिन असल्यानं सगळेच त्यांच्या घरातील महिलांपासून आपल्या ऑफिसमधील महिलांना देखील शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळते.