जसलीन आयुष्यात येण्यापूर्वी अनुप जलोटांचे तीन घटस्फोट

भजन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले अनुप जलोट यांची बिग बॉसच्या सीझन 12 मध्ये एन्ट्री झाल्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू आहे. जलोटा बिग बॉसमध्ये जोडीसोबत आलेत. 

Sep 18, 2018, 15:34 PM IST
1/5

गर्लफ्रेंड जसलीन मथारू

गर्लफ्रेंड जसलीन मथारू

28 वर्षांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू हिच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे अनुप यांची घरात आणि घराबाहेरही चर्चा सुरू आहे. दोघं एकमेकांसोबत गेल्या तीन वर्षांपासून संबंधात आहेत. उल्लेखनीय म्हणजे, जसलीन जलोट यांच्याहून 37 वर्षांनी लहान आहे. ती जलोटा यांची शिष्याही आहे. गाण्यासोबत जसलीन डान्सही चांगला करते. 

2/5

पहिली पत्नी - सोनाली सेठ

पहिली पत्नी - सोनाली सेठ

जसलीन आयुष्यात येण्यापूर्वी अनुप जलोटांचे तीन घटस्फोट झालेत. त्यांची पहिली पत्नी गायिका सोनाली सेठ... सोनालीदेखील अगोदर अनुप यांची शिष्या होती... काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला आणि सोनालीनं गायक रुपकुमार राठोड यांच्यासोबत दुसरा विवाह केला.

3/5

दुसरी पत्नी - बीना भाटिया

दुसरी पत्नी - बीना भाटिया

सोनालीनंतर अनुप जलोटा यांनी कुटुंबीयांच्या मर्जीशिवाय बीना भाटिया यांच्यासोबत दुसरा विवाह केला. परंतु, त्यांचा हा दुसरा विवाहही दीर्घकाळ टीकू शकला नाही.

4/5

तिसरी पत्नी - मेधा गुलजार

तिसरी पत्नी - मेधा गुलजार

अनुप जलोटा यांनी तिसरा विवाह मेधा गुलजार यांच्यासोबत केला. मेधा माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुलजार यांची भाची होती. मेधा आणि अनुप यांना एक मुलगाही आहे. मेधा यांचा पहिला विवाह शेखर कपूर यांच्याशी झाला होता. परंतु, 1994 साली दोघांचा घटस्फोट झाला. 2014 साली मेधा यांचा लिव्हर निकामी झाल्यानं त्यांचं निधन झालं होतं. 

5/5

जसलीन-अनुप यांचा नात्याचा सगळ्यांनाच धक्का

जसलीन-अनुप यांचा नात्याचा सगळ्यांनाच धक्का

अनुप यांची सद्य गर्लफ्रेंड जसलीन पंजाबच्या कुटुंबातून आहे. आत्तापर्यंत या दोघांच्या नात्याबद्दल अगदी जसलीनच्या कुटुंबीयांनादेखील ठावूक नव्हतं. परंतु, बीग बॉसच्या निमित्तानं आता ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलीय.