'या' 5 कारणांमुळे कोलकाता पोलीस पांढऱ्या रंगाचा गणवेश घालतात

कोलकाता पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढरा का असतो? याचे कारण तुम्हाला माहिती का? वाचा सविस्तर

| Oct 23, 2024, 16:09 PM IST
1/6

पोलीस

देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस दलाचा ड्रेस खाकी रंगाचा असतो. मात्र, कोलकाता पोलिसांच्या ड्रेसचा रंग हा पांढरा आहे. 

2/6

खाकी रंग

भारतातील इतर राज्यांमधील पोलिसांच्या ड्रेसचा रंग खाकी असला तरी कोलकाता पोलिसांच्या ड्रेसचा रंग हा पांढरा आहे. 

3/6

कोलकाता पोलीस

1845 मध्ये ब्रिटिशांनी कोलकाता पोलिसांची स्थापना केली होती. त्याच वेळी त्यांनी पोलिसांच्या ड्रेसचा रंग पांढरा ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 

4/6

समुद्रकिनारा

किनारी भाग असल्याने तेथील आर्द्रता थोडी जास्त आहे. त्यामुळे गणवेशाचा रंग पांढरा ठेवण्यात आला आहे. वास्तविक, पांढरा रंग सूर्यापासून निघणाऱ्या उष्णतेचा प्रभाव कमी करतो. 

5/6

बंगाल पोलीस

पश्चिम बंगालचे राज्य पोलीस हे तपकिरी रंगाचा ड्रेस घालतात. तर कोलकाता पोलीस पांढरा रंगाचा ड्रेस घालतात. 

6/6

पांढरा ड्रेस

1847 मध्ये सर्व पोलिस कर्मचारी पांढरा ड्रेस गणवेश घालतील असा आदेश आला होता. यामुळेच कोलकाता पोलिस पांढऱ्या ड्रेसमध्ये आपली सेवा देतात.