लिंबू रंगाची साडी पुन्हा चर्चेत; निमित्त मात्र निवडणुकांचं!

May 12, 2019, 11:25 AM IST
1/7

देशात लोकसभा निवडणूक सहाव्या टप्प्यात पोहचली आहे. या निवडणूकीत सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची महत्त्वाची भूमिका असते. याच दरम्यान एका लिंबू रंगाच्या साडीतील महिलेचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत.   

2/7

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM)सह दिसणाऱ्या लिंबू रंगाच्या साडीतील महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोसह एक कॅप्शन लिहिलं जात आहे. 'या मिसेस जयपुर नलिनी सिंह. समाज कल्याण विभागात आहेत. ईएसआयच्या कुमावत शाळेत यांना निवडणूक ड्यूटी लावण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर ९८ टक्के मतदान झालं आहे.' अशा कॅप्शनने फोटो पोस्ट केले जात आहेत.  

3/7

अनेक जणांनी ही महिला नलिनी सिंह सरकारी अधिकारी असून यांच्या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदार मतदान करण्यासाठी पोहचले असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. परंतु हे पूर्णपणे खरं नसल्याचं समोर आलं आहे. 

4/7

ही महिला अधिकारी जयपुरची नसून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊची असल्याचं समोर आलं आहे.  

5/7

६ मे म्हणजेच चौथ्या टप्प्यातील निवडणूकीदरम्यान एका स्थानिक वृत्तपत्राने या महिलेचा फोटो प्रकाशित केला होता. ज्यात ही महिला ईव्हीएम घेऊन जाताना दिसली होती.

6/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पिवळ्या साडीतील महिलंच खरं नाव रीना द्विवेदी असून ती लखनऊच्या पीडब्ल्यूडीमध्ये कार्यरत आहे. या महिलेला शहरातील नगराम भागातील १७३ नंबरच्या मतदान केंद्रावर निवडणूक ड्यूटी लावण्यात आली होती. 

7/7

एका फोटो जर्नलिस्टने वृत्तपत्रासाठी माझे फोटो काढले होते, जे अचानक व्हायरल झाले. सोशल मीडियामध्ये माझ्या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाल्याचं बोललं जात आहे ते पूर्णपणे चुकीचं असून माझ्या मतदान केंद्रात ७० टक्के मतदान झाल्याचं खुद्द रीना द्विवेदीने म्हटलं आहे.