Mothers Day 2019 : बॉलिवूड म्हणतंय, 'मेरे पास माँ है.... '

May 12, 2019, 08:12 AM IST
1/9

Mothers Day 2019 : बॉलिवूड म्हणतंय, 'मेरे पास माँ है.... '

मातृदिन.... आईचे आभार मानण्याचा एक औपचारिक दिवस. खरंतर आई दररोज तिच्या मुलांसाठी काही ना काही वेगळं आणि खऱ्या अर्थाने रॉकिंग असं काम करत असते. पण, तिच्या या कामालाठी कधी आभार मानले जाण्याची वेळ मात्र येत नाही. अर्थात तिला याची अपेक्षाही नसते. तरीही मातृदिनाच्या दिनवसली मात्र आईचे नुसते आभार व्यक्त केले तरीही, तिच्या चेहऱ्यावर खुलणारं हास्य आणि आनंद एका बाजूला आणि साऱ्या जगातील सुख एका बाजूला.  हिंदी कलाकविश्वातही रुपेरी पडद्यावर 'आई'च्या भूमिकांना विषेष महत्त्व देण्यात आलं. मग त्या 'मदर इंडिया'तील आपल्या मुलाला त्याच्या चुकीची शिक्षा देणाऱ्या नर्गिस असो, किंवा अगदी बधाई हो मधील  नीना गुप्ता असो. आईची ही रुपं चित्रपटांमध्ये काळाच्या बरीच पुढे विचार करणारी दाखवण्यात आली आणि वेळोवेळी दृष्टीकोन बदलण्याचा नवा मार्ग आणि शिकवणही देऊन गेली. चला तर मग नजर टाकूया यापैकीच काही निवडक उदाहरणांवर... 

2/9

निरुपा रॉय

चित्रपटांतील आई म्हटलं की काही अभिनेत्रींची नावं हमखास समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे निरुपा रॉय. 'मेरे पास माँ है....' हा डायलॉग म्हणजे निरुपा रॉय यांची ओळख असं म्हणायला हरकत नाही. 

3/9

फरिदा जलाल

शाहरुख खानपासून अभिनेत्री काजोलपर्यंत प्रत्येकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री फरिदा जलाल या ९० च्या दशकात त्यांच्या भूमिकांमुळे चांगल्याच गाजल्या होत्या. 

4/9

रिमा लागू

सलमान खानची ऑनस्क्रीन आई, म्हणून एका अभिनेत्रीचं नाव नेहमीच पुढे आलं. ते नाव म्हणजे अभिनेत्री रिमा लागू. सलमानसोबतच शाहरुख, संजय दत्त या कलाकारांच्या आईचीही भूमिकाही त्यांनी साकारली होती. 'वास्तव'मध्ये त्यांनी साकारलेली संजय दत्तची आई, विशेष गाजली. 

5/9

जया बच्चन

२००० च्या दशकात अभिनेत्री जया बच्चन यासुद्धा आईच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं होतं. 'कल हो ना हो', 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. 

6/9

किरण खेर

बदलणाऱ्या प्रत्येक पिढीनुसार बदलणारी आई साकारण्याचं श्रेय जातं अभिनेत्री किरण खेर यांना. 'ओम शांती ओम' या चित्रपटात शाहरुखची आई साकारण्यापासून ते 'खुबसूरत' या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूरच्या आईची भूमिकाही त्यांनी साकारली. प्रत्येक भूमिकेतलं त्यांचं वेगळेपण आणि मनमोकळेपणा हा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा.  

7/9

रत्ना पाठक शाह

वास्तववादी भूमिका त्यातही वास्तववादी आणि काळानुरुप बदलणाऱ्या आईची भूमिका साकारण्यासाठी रत्ना पाठक शाह या कायम प्रकाशझोतात राहिल्या. 

8/9

श्रीदेवी

'इंग्लिश विंग्लिश'मध्ये इंग्रजी शिकण्यासाठीचा खटाटोप करणारी, कुटुंबाला सर्वतोपरी महत्त्व देणारी आणि अतिशय महत्त्वाकांक्षी असणारी 'शशी' श्रीदेवी यांनी अतिशय सुरेखपणे साकारली होती. तर, 'मॉम' या चित्रपटात आपल्या सावत्र मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी आईसुद्धा त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारली होती. 

9/9

नीना गुप्ता

हिंदी कलाविश्वात बऱ्याच काळांनंतर परतणाऱ्या नीना गुप्ता यांची 'बधाई हो' या चित्रपटातील भूमिका फक्त समीक्षकांनाच नव्हे, तर प्रेक्षकांनाही भावली. मुलाच्या लग्नाच्या वयात आईचं गरोदर राहणं, ही कल्पनाही अनेकांच्या डोक्यात येत नाही. पण, त्याच भूमिकेला नीना गुप्ता यांनी साकारलं आणि आयुष्यातकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन असतो हे सिद्ध केलं.