Land Rover कंपनीकडून Defender चं नवीन मॉडेल लॉन्च, पाहा फोटो

Land Rover Defender 75th Limited Edition: यंदाच्या वर्षी लँड रोव्‍हर डिफेण्‍डर 75 व्‍या लिमिटेड एडिशनसह वर्धापन दिन साजरा करत आहे. या लग्जरी कारच्या फीचर्स आणि स्पेसिफीकेशन्सचा सर्वत्र बोलबाला सुरु आहे. असं काय स्पेशल आहे या लग्जरी कारमध्ये आणि 75 व्या लिमिटेड एडिशनचं नेमकं वैशिष्ट्य काय आहेत? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहेत. 

Sep 20, 2022, 09:30 AM IST
1/4

Land Rover Defender 75th Limited Edition

पहिल्‍यांदाच, डिफेण्‍डर एडिशनमध्ये एक्‍स्‍टीरिअर फिनिशमध्‍ये ग्रॅस्‍मेरे ग्रीन रंगाची (Grasmere Green Color) भर करण्‍यात आली आहे. हा रंग खासकरून 75 व्‍या लिमिटेड एडिशनसाठी राखून ठेवण्‍यात आला होता. या लिमिटेड एडिशन वेईकलमधील 50.8 सेमी (80 इंच) अलॉई व्‍हील्‍सच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या कॅप्‍सना देखील ग्रॅस्‍मेरे ग्रीन रंग देण्‍यात आला आहे. एक्‍स्‍टीरिअरच्‍या आकर्षकतेला 75 इअर्स ग्राफिक आणि सेरेस सिल्‍व्‍हर बंपर्स परिपूर्ण करतात.

2/4

Land Rover Defender 75th Limited Edition

डिफेण्‍डरच्‍या टिकाऊ व वैविध्‍यपूर्ण इंटीरिअरमध्‍ये देखील असाच बदल करण्‍यात आला आहे. क्रॉस कार बीमला ग्रॅस्‍मेरे ग्रीन पावडर कोटचे फिनिशिंग देण्‍यात आलं आहे आणि क्रॉस कार बीम एण्‍ड कॅप्‍सवर लेझर-युक्‍त फिनिशिंग आहे. त्यासबरोबर, सीट्सना रेसिस्‍ट एबोनी रंग देण्‍यात आला असून सेंटर कन्‍सोलवरील हॉकी स्टिकमध्‍ये डिफेण्‍डरमध्‍ये उपलब्‍ध सर्वात प्रबळ फॅब्रिक रोबूस्‍टेक साहित्‍य आहे. 

3/4

Land Rover Defender 75th Limited Edition

लिमिटेड एडिशनमध्‍ये उच्‍च वैशिष्‍ट्यपूर्ण एचएसईसह सर्वसमावेशक प्रमाणित इक्विपमेंट आहे. नवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञानामध्‍ये ३डी सराऊंड कॅमेरा, कॉन्फिग्‍युरेबल टेरेन रिस्‍पॉन्‍स, मेरिडियन साऊंड सिस्टिम, मॅट्रिक्‍स एलईडी फ्रण्‍ट लायटिंग, 28.95 सेमी (11.4 इंच) पीवी प्रो इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम, हेड-अप डिस्‍प्‍ले आणि वायरलेस डिवाईस चार्जर यांचा समावेश आहे. 

4/4

Land Rover Defender 75th Limited Edition

सर्व 75 व्‍या लिमिटेड एडिशन मॉडेल्‍समध्‍ये फोल्डिंग फॅब्रिक रूफ किंवा स्‍लाइडिंग पॅनोरॅमिक रूफचा पर्याय देखील आहे. 14-वे ड्रायव्‍हर व पॅसेंजर हिटेड इलेक्ट्रिक मेमरी सीट्स, हिटेड स्‍टीअरिंग व्‍हील आणि थ्री झोन क्‍लायमेट कंट्रोलमधून अधिक आरामदायी राइडच्‍या अनुभवाची खात्री मिळते. सुधारित क्षमतेसाठी इलेक्ट्रिकली डिप्‍लॉयेबल टो बार आणि ऑल-सीझन टायर्सची पर्याय म्‍हणून भर करता येऊ शकते.