कार आहे की बेडरुम? 48 इंच TV पाहून म्हणाल कारची किंमत काय हो?

Auto News : मुळात कार खरेदी करताना आपण भरत असलेल्या रकमेच्या तुलनेत त्यात मिळणाऱ्या सुविधाही त्याच पद्धतीच्या आणि किमतीला साजेशा असाव्याच ही एकच सर्वांची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करणारी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कार नुकतीच भारतात लाँच झाली आहे. 

Mar 18, 2024, 12:00 PM IST

Auto News : एखादी कार खरेदी करत असताना ती कार नेमकी कशी असावी असा प्रश्न विचारला की, कारचे फिचर्स आणि इतर गोष्टींचा पाढा लगेचच अनेकजण वाचून दाखवतात. 

 

1/7

लक्झरी एमपीव्ही

lexus lm 350h luxury mpv launched in india price and  features auto news

लेक्सस इंडियानं भारतात  LM 350h लक्झरी एमपीव्ही लाँच केली आहे. 4 सीटर लाऊंज पॅकेजसह रेंज टॉपिंग व्हेरिएंटही कंपनीनं लाँच केलं आहे. एकाहून एक सरस लूक, अॅडवान्स फिचर्स आणि इतर सुविधांसह ही देशातील एक लक्झरी एमपीव्ही ठरत आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 2 कोटी रुपये, तर अॅडवान्स मॉडेलची किंमत 2.50 कोटी रुपये इतकी आहे. 

2/7

Lexus LM

lexus lm 350h luxury mpv launched in india price and  features auto news

Lexus LM ला पुढच्या भागात एक ओवरसाइज़्ड ग्रिल देण्यात आलं असून, ते हेडलँप आणि स्टायलिश वर्टिकल फॉगलँपशी कनेक्टेड आहे. या कारची लांबी 5130 मिमी, रुंदी 1890 मिमी उंची 1945 मिमी आणि व्हीलबेस 3000 मिमी इतकी आहे. त्यामुळं ती नेमकी किती मोठी आहे  याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. 

3/7

केबिनमध्ये बरीच जागा

lexus lm 350h luxury mpv launched in india price and  features auto news

ही कार 4 आणि 7 सीटर अशा दोन व्हेरिएंटमध्ये तुमच्या भेटीला आली आहे. या कारच्या 4 सीटर व्हेरिएंटमध्ये केबिनमध्ये बरीच जागा तुम्हाला मिळणार आहे. तिचं इंटेरियर एखाद्या बेडरुमइतकं कमाल असणार आहे. कारच्या लक्झरी एमपीवीमध्ये पॅनल ग्लॉस देण्यात आलं असून, त्याचा वापर पार्टीशन म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळं प्रवासादरम्यान मागचा आणि पुढचा भाग दोन खोल्यांमध्ये विभागला जाऊ शकतो.   

4/7

स्पेस आणि कन्फर्टची पू्र्ण काळजी

lexus lm 350h luxury mpv launched in india price and  features auto news

Lexus LM मध्ये स्पेस आणि कन्फर्टची पू्र्ण काळजी घेण्यात आली आहे. कारच्या केबिनमध्ये 48 इंचांचा टीव्ही, सराऊंड साऊंड सिस्टीमसह 23 स्पीकर, पिलो स्टाईल हेडरेस्ट देण्यात आला आहे. याशिवाय कारमध्ये लहानसा फ्रीज, फोल्डेबल टेबल, छत्री ठेवण्यासाठी अम्ब्रेला होल्डर, हीटेड आर्मरेस्ट, अनेक युएसबी पोर्ट, वायरलेस फोन चार्जर, पुस्तक वाचण्यासाठी रिडींग लाईट, व्हॅनिटी मिरर देण्यात आला आहे. 

5/7

वॉईस कंट्रोल सिस्टीम

lexus lm 350h luxury mpv launched in india price and  features auto news

Lexus LM मध्ये वॉईस कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्टफोन स्टाईल कंट्रोल पॅनल, क्लायमेट कंट्रोल पॅनल, सीट फंक्शन, इंटीरियर लायटिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. 

6/7

एडवांस ड्राइविंग असिस्टेंट

lexus lm 350h luxury mpv launched in india price and  features auto news

सोबतच कारमध्ये नॉईस कंट्रोल प्रणालीही देण्यात आली आहे. कारला दोन वेगळे सनरुफ असून, मागं बसणाऱ्या प्रवाशांना त्यांचा स्वतंत्र सनरुफ मिळणार आहे. इतर फिचर्सविषयी सांगावं तर, कारमध्ये डिजिटल रियर व्ह्यू, डिजिटल इंफोटेनमेंट सिस्टम, एडवांस ड्राइविंग असिस्टेंट सिस्टम (ADAS), लेन डिपार्चर अलर्ट, प्रोएक्टिव ड्राइविंग असिस्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत.   

7/7

कारचं इंजिन

lexus lm 350h luxury mpv launched in india price and  features auto news

कारच्या इंजिनविषयी सांगावं तर त्यामध्ये LM (350h) ला कारनं 2.5 लीटर क्षमता असणारं 4 सिलेंडर सेल्फ चार्जिंग हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनमधून 250hp पॉवर आणि 239Nm टॉर्क जनरेट करतो.