Ligier Myli : Tata Nano पेक्षा आकाराने लहान कार; फुल चार्जमध्ये मिळणार 230 KM ची ड्रायव्हिंग रेंज
Ligier Myli कार आकाराने Tata Nano कारपेक्षा लहान आहे. या कारचे डिझाईन देखील खूपच डिसेंट वाटत आहे. डिसेंट लूक आणि आकर्षक रंगात ही कार उपलब्ध होणार आहे.
Ligier Myli : एका लाखात कार विकत घेता येऊ शकते, असं स्वप्न टाटांनी भारतीयांना दाखवलं आणि प्रत्यक्षात साकारले देखील नॅनो कारमुळे. मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातली कार बजेट कारसह सर्वात छोटी कार अशी वेगळी ओळख देखील नॅनो कारने बनवली. आता लवकरच नॅनो (Tata Nano) कारपेक्षा आकाराने लहान असलेली कार लाँच होणार आहे. Ligier Myli असे या कारचे नाव आहे. सध्या या कारचे टेस्टिंग सुरु आहे. या कारचे टेस्टिंग सुरु असतानाचा फोटो व्हायरल झाले आहेत.