Lionel Messi : 234 कोटींचं अलिशान घरं, महागड्या कार... डोळे दिपवणारं वैभव

FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं त्याचा स्वप्नापासून काही तास दूर आहे. रविवारी 18 डिसेंबर 2022 रोजी फिफा वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. 

Dec 17, 2022, 10:30 AM IST

Lionel Messi Luxurious Lifestyle: फिफा वर्ल्डकपची फायनल (FIFA World cup Final 2022 ) रविवारी 8 डिसेंबर 2022 रोजी कतारमध्ये रंगणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स (Argentina Vs France) या दोन टीम फिफावर नाव कोरण्यासाठी जीवाची बाजी लावणार आहेत. फुटबॉलचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आपल्या कारकीर्दमधील शेवटचा वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यात आता सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे मेस्सीची...मेस्सीचं वैभव पाहून तुमचेही डोळे चक्रावलेल...(lionel messi luxurious lifestyle 4 bungalows expensive cars and jet net wealth fifa world cup final)

1/8

 Pagani Zonda Tricolore

जगातील दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे चाहते यावेळी जादुई खेळाचा आनंद घेत आहेत. मेस्सीकडे जगभरात विविध ठिकाणी सुमारे 234 कोटी रुपये किमतीची आलिशान घरं आहेत.  दोन मिलियन डॉलर्सची Pagani Zonda Tricolore, Masserati GranTurismo, Ferrari F430 Spyder, Dodge Charger SRT8, Audi-Range Rover या गाड्या आहेत.

2/8

luxurious

मेस्सीची जगभरात 4 ठिकाणी आलिशान घरं आहेत. सर्वात महागडं घर स्पेनजवळील इबिझा बेटावर आहे. त्याची किंमत सुमारे 97 कोटी रुपये आहे.  

3/8

luxurious 1

दुसरा बंगला हा 56 कोटींचा असून तो बार्सिलोनामध्ये आहे.  हे घर मेस्सीच्या पत्नी आणि त्यांचा मुलांचं आवडतं घर आहे. 

4/8

luxurious 2

अमेरिकेच्या मियामीमध्ये 51 कोटीचा तिसरा बंगला आहे.  या घराच 4 बेडरूम आहेत. 

5/8

luxurious 3

अर्जेंटिनामध्येही मेस्सीचं एक घर आहे. त्याची किंमत 31 कोटी इतकी आहे. या घरात 20 ते 25 खोल्या आहेत. 

6/8

messi

मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीचं नेटवर्थ 400 मिलियन डॉलर जवळपास 3286 कोटी रुपये आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

7/8

lionel

मेस्सीच्या बार्सिलोना बंगल्यात समुद्राजवळ एक खासगी फुटबॉल मैदानही आहे. शिवाय स्टार फुटबॉलरकडे MiM Sitges नावाचे लक्झरी हॉटेल देखील आहे, ज्यात 77 बेडरूम आहेत. 

8/8

lionel messi jet

 मेस्सीकडे एक खाजगी जेटदेखील आहे. या जेटच्या मागच्या बाजूला 10 नंबरचं चिन्ह आहे तो मेस्सीच्या जर्सीचा नंबर आहे. या जेटची किंमत जवळपास 100 कोटी एवढी आहे. या जेटमध्ये दोन बाथरुम एक स्वयंपाकघर आणि 16 पेक्षा जास्त लोक यांतून प्रवास करु शकतात.