पॉपकॉर्न, गेमिंग, औषधं; GST परिषदेनंतर काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच वस्तू आणि सेवा कर परिषद (जीएसटी) पार पडली. यावेळी जीएसटीमधील काही बदलांची घोषणा करण्यात आली होती. यामुळे काही गोष्टी महाग तर काही स्वस्त झाल्या आहेत. वाचून घ्या संपूर्ण यादी...  

| Jul 13, 2023, 16:56 PM IST
1/9

काय स्वस्त, काय महाग?

List of things that have become cheaper and costlier after GST Council

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच वस्तू आणि सेवा कर परिषद (जीएसटी) पार पडली. यावेळी जीएसटीमधील काही बदलांची घोषणा करण्यात आली होती. यामुळे काही गोष्टी महाग तर काही स्वस्त झाल्या आहेत. वाचून घ्या संपूर्ण यादी...  

2/9

स्वस्त

List of things that have become cheaper and costlier after GST Council

मल्टिप्लेक्समधील पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थांवर आता 18 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे आता पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थ स्वस्त होतील.   

3/9

स्वस्त

List of things that have become cheaper and costlier after GST Council

तळलेल्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणार्‍या अर्ध-तयार घटकांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला आहे. यामध्ये न शिजवलेले, न तळलेले आणि स्नॅक पॅलेटचा समावेश आहे.  

4/9

स्वस्त

List of things that have become cheaper and costlier after GST Council

माशापासून काढल्या जाणाऱ्या तेलावरील जीएटी 18 वरुन 5 टक्क्यांवर आणला आहे.   

5/9

स्वस्त

List of things that have become cheaper and costlier after GST Council

कृत्रिम जरीच्या धाग्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्के आणला आहे.   

6/9

महाग

List of things that have become cheaper and costlier after GST Council

कौशल्य आधारित गेमिंगवरील बेट्सच्या मूल्यावर 28 टक्के जीएसटी लावण्यात आल्याने, आता ते महाग झालं आहे.   

7/9

महाग

List of things that have become cheaper and costlier after GST Council

ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनो यावर 28 टक्के कर लागणार आहे.  

8/9

स्वस्त

List of things that have become cheaper and costlier after GST Council

कर्करोगाशी आणि दुर्मिळ आजारांवरील औषधं आणि विशेष वैद्यकीय हेतूंसाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना जीएसटी करातून सूट देण्यात आली आहे.  

9/9

स्वस्त

List of things that have become cheaper and costlier after GST Council

उपग्रह प्रक्षेपण सेवांनाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. यामुळे या क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढू शकते.