महाराष्ट्रातील सर्वात जुनं राम मंदिर कोणतं? तुम्हाला माहित आहे का?

 अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने महराष्ट्रातील सर्वात जुने राम मंदिर देखील चांगलेच चर्चेत आले आहे. जाणून घेवूया या मंदिराचा इतिहास.

Jan 23, 2024, 18:57 PM IST

Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.संपूर्ण देश राममय झाला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात जुन्या राम मंदिरात देखील विशेष पूजेचे आयोजन करण्यातआले होते. जाणून घेवूया नेमकं कुठे आहे महाराष्ट्रातील हे सर्वात जुनं राम मंदिर.

1/7

 महाराष्ट्रातील नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे प्रभू रामाचे सर्वात जुने मंदिर आहे. 

2/7

रामटेक मंदिर किल्ल्यासारखे दिसते. राजा रघु खोंसले यांनी हे मंदिर किल्ला म्हणून बांधले होते. रामनवमीला येथे मोठा उत्सव भरतो.  या मंदिराबाबत अनेक अख्यायिका आहेत. 

3/7

महान कवी कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य  देखील या रामटेक मंदिरातच लिहीले असे देखील पुराणात सांगण्यात आले.   

4/7

प्रभू राम आणि अगस्त्य ऋषी यांची भेट देखील या रामटेक मंदिरातच झाली होती.

5/7

छोट्या टेकडीवर बांधलेल्या रामटेक मंदिराला गड मंदिर असेही म्हणतात. याशिवाय हे मंदिर सिंदूर गिरी नावानेही ओळखले जाते.  

6/7

भगवान रामाने माता सीता आणि भगवान लक्ष्मणासोबत वनवासातील चार महिने येथेच घालवले होते अशी अख्यायिका आहे.

7/7

रामटेक मंदिर हे हे जवळपास 400 वर्ष जुने असल्याचे समजते. या मंदिराचा संबध थेट प्रमू रामचंद्र यांच्या वनवासातील कालखंडाशी आहे.