सर्वात आधी कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा लॉकडाऊन

Feb 27, 2021, 15:14 PM IST
1/4

संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. जगातील अनेक देशांमध्ये मोठा प्रमाणात यामुळे जीवीतहानी झाली आहे. अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. न्यूझीलंड हा पहिला देश होता जो कोरोनामुक्त झाला होता. पण आता पुन्हा एकदा या देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. 

2/4

न्यूझीलंडच्या पंतप्रधान सिंडा आर्डर्न यांनी शनिवारी म्हटलं की, देशातील सर्वात मोठे शहर ऑकलंड पुन्हा एकदा लॉकडाऊन अंतर्गत आहे. कोरोना विषाणूची वाढत्या घटना लक्षात घेता रविवारपासून सात दिवसांचा लॉकडाउन ऑकलंडमध्ये लागू करण्यात येणार आहे. 

3/4

एका न्यूज कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांनी सांगितले की, 'ऑकलंडमधील लॉकडाऊनशिवाय न्यूझीलंडच्या उर्वरित भागात सार्वजनिक समारंभांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या ठिकाणी लेव्हल 2 चे निर्बंध घातले जातील.'

4/4

याच महिन्यात ऑकलंडमध्ये तीन दिवसांचे लॉकडाउन केले गेले होते. शहरातील जवळपास 20 लाख लोकांना 3 दिवस घरातच राहावं लागलं होतं. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येथे 7 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.