तेजस नेरूरकरच्या 'फोन कॅमेऱ्यावरून मारलेल्या गप्पा'
छायाचित्रकार तेजस नेरूरकरचं नवं फोटो शूट
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या परिस्थितीत सगळ्यांची काम थांबली आहेत. लॉकडाऊनचा फटका सिनेसृष्टीला देखील पडला आहेत. मात्र असं असलं तरीही कलाकार कधीच थांबत नसतो. एक छोटासा ब्रेक घेऊन प्रत्येक कलाकार नव्या कृतीसह सज्ज होतो. असाच एक कलाकार लॉकडाऊनमध्ये नव्या कृतीसह चर्चेत आला आहे.
छायाचित्रकार तेजस नेरूरकरने मराठी सिनेसृष्टी नावाच्या कुटुंबामधील काही सदस्यांशी 'फोन कॅमेरावरून मारलेल्या गप्पा' म्हणत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो घेण्यात आले आहेत.