Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

May 19, 2019, 19:44 PM IST
1/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

देशातल्या सगळ्यात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या ८० जागांपैकी ५४ जागांवर भाजप, २२ जागांवर सपा-बसपा महागठबंधन आणि २ जागांवर काँग्रेसचा विजय होण्याची शक्यता आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ७२ जागा मिळाल्या होत्या. पण यंदा मात्र भाजपचं १८ जागांचं नुकसान होऊ शकतं. 

2/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

तामिळनाडूमध्ये ३८ जागांपैकी २५ जागांवर डीएमके, ७ जागांवर काँग्रेस, एआयडीएमकेला ५ आणि भाजपला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

3/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची सत्ता गेली होती. पण लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधून भाजपने जोरदार पुनरागमन केलं आहे. राजस्थानच्या २५ जागांपैकी २२ जागांवर भाजपचा आणि ३ जागांवर काँग्रेसचा विजय होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. 

4/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

ओडिशाच्या २१ जागांपैकी १४ जागांवर बीजेडी,  ६ ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसचा विजय होईल. 

5/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशमधून भाजपची सत्ता गेली होती. पण लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप मध्य प्रदेशमधून जोरदार पुनरागमन करण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशच्या २९ जागांपैकी १७ जागांवर भाजप आणि १२ जागांवर काँग्रेसचा विजय होण्याची शक्यता आहे. 

6/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

कर्नाटकच्या २८ जागांपैकी भाजपला १८ जागा, काँग्रेसला ७, जेडीएसला २ आणि १ अपक्ष उमेदवार जिंकून येऊ शकतो. 

7/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपला २२ जागा आणि काँग्रेसला ४ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

8/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

पोल डायरीच्या सर्व्हेनुसार बिहारमध्ये भाजपला १६ जागा, जेडीयू आणि एलजेपीला १६ जागा, काँग्रेसला ३, राजदला ४ आणि आरएलएसपीला १ जागा मिळेल. 

9/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी चंद्रबाबू नायडूंना मोठा धक्का देण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला १७ जागा, तेलगू देसमला ७ जागा, जनसेनेला १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप आणि काँग्रेसला मात्र आंध्र प्रदेशमध्ये खातंही खोलता येणार नाही. 

10/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

पश्चिम बंगालमध्ये भाजप मोठी मुसंडी मारण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल डायरीच्या सर्व्हेनुसार एनडीएला १९, तृणमुल काँग्रेसला १९, यूपीएला ३ आणि इतर पक्षांना १ जागा मिळेल. 

11/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेला ३४ जागा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

12/12

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

Exit Poll 2019 : महानिकाल, सरशी कुणाची?

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल. ५४३ मतदारसंघापैकी एनडीएला २९२ जागा, यूपीएला १३६ जागा आणि इतर पक्षांना ११४ जागा मिळतील.