Loksabha Election 2019 : जाणून घ्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावे किती संपत्ती...

Apr 09, 2019, 17:18 PM IST
1/5

Loksabha Election 2019 : जाणून घ्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावे किती संपत्ती...

अभिनयाकडून राजकीय क्षेत्राकडे वळलेल्या नावांमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचाही समावेश झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उर्मिला यांनी नुकताच उत्तर मुंबई मतदार संघासाठीचा अर्ज भरला. काँग्रेसतर्फे त्यांनी हा अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी एका रॅलीच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. शिवाय त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशीलही सादर केला. 

2/5

Loksabha Election 2019 : जाणून घ्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावे किती संपत्ती...

सध्याच्या घडीला उर्मिला यांच्याकडे ४१ कोटींची जंगम मालमत्ता असून, स्थावर मालमत्तेच ४ फ्लॅट्सचा समावेश आहे. उर्मिला यांच्याकडे असणाऱ्या जंगम मालमत्तेमध्ये शेअर्स, बॉण्ड्स, म्युच्युअल फंड अशी एकूण २८.८ कोटींची मालमत्ता आहे. 

3/5

Loksabha Election 2019 : जाणून घ्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावे किती संपत्ती...

उर्मिला यांच्याकडे एक मर्सिडीज कारही आहे. तर, त्यांच्याकडे असणाऱ्या स्थावर मालमत्तेत ४ फ्लॅट्सचा समावेश आहे. त्यांच्या या चारही फ्लॅटची किंमत २३ कोटी ५३ लाख रुपये इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात मातोंडकर यांच्या नावे जवळपास ९ एकरांच्या २ शेतजमिनी असून असल्याचंही स्पष्ट होत आहे. 

4/5

Loksabha Election 2019 : जाणून घ्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावे किती संपत्ती...

उर्मिला यांच्या या मालमत्तेत रोख रक्कम, बँकेतील ठेवी आणि दागिन्यांचाही समावेश आहे. त्यांच्या पतीकडे सध्याच्या घडीला ३२ लाख ३५ हजार इतकी मालमत्ता आहे. 

5/5

Loksabha Election 2019 : जाणून घ्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावे किती संपत्ती...

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिला यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या निमित्ताने विविध मार्गांचा अवलंब केल्याचं पाहायला मिळालं. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यापासून, ते सर्वसामान्यांशी संवाद साधण्य़ापर्यंत शक्य त्या सर्व मार्गांनी त्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. अभिनय क्षेत्रात नावाजलेल्या या अभिनेत्रीला आता मतदाररुपी प्रेक्षकांची पसंती मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.