Lucky Money Plant: पैसै कमवणं झालं आणखी सोप्प! 'हे' रोप लावा अन् भरगच्च पैसा कमवा...

Lucky Plants for Balcony, Money Attracting Plants for Home: वास्तूशास्त्र आणि फेंगशुईमध्ये अशा काही प्लांट्सबद्दल माहिती सांगितली आहे, ज्यांच्यामुळे तुमच्याकडे पैशाचा पाऊस पडेल. घराच्या बालकनीमध्ये या प्लांटला ठेवल्याने तुमची पैशांची समस्या दूर होईल आणि तुमच्याकडे भरपूर पैसा येईल. चला तर मग जाणून घेऊया या प्लांट्सबद्दल... 

Sep 20, 2022, 17:52 PM IST
1/5

मनी प्लांट: नावावरून हे स्पष्ट होतं की, हे प्लांट एक धन-समृद्धी प्लांट आहे. हे प्लांट घराच्या बाल्कनीत लावल्याने खूप फायदा होतो. मनी प्लांट लावण्यासाठी योग्य दिशा उत्तर दिशा असून त्याची वेल नेहमी खालून वर जावी. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये मनी प्लांट खूप शुभ मानले जातं. हे प्लांट फक्त दक्षिण दिशेला लावू नका.

2/5

तुळशीचे रोप: तुळशी किंवा तुळशीचे रोप हिंदू धर्मात पूजनीय मानलं जातं. यासोबतच तुळशीचे रोप देखील धनवान बनवते. कारण, तुळशीच्या रोपाला देवी लक्ष्मीचे रूप मानलं जातं. तुळशीचे हिरवे रोप उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते.

3/5

नौबजियाचे रोप: वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये बाल्कनीमध्ये नौबजियाचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. हे दिसायलाही खूप सुंदर आहे आणि पैशासाठी नवीन मार्ग तयार करते आणि त्याचबरोबर  वाढही देते.

4/5

अरेका पाम ट्री: वास्तुमध्ये ताडाचे झाड देखील खूप शुभ मानले जाते. हे दिसायला सुंदर आहे आणि घरात आनंद, पैसा आणि नशीब आणते. याशिवाय घरातील लोकांचे आरोग्यही चांगले राहते. नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणते.

5/5

क्रॅसुला वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसे आकर्षित करते. बाल्कनीमध्ये क्रॅसुला रोप लावल्याने पैशाची हानी थांबते आणि पैशाची आवक झपाट्याने वाढते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर घरामध्ये क्रॅसुला रोप लावणे खूप चांगली कल्पना आहे. (Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)