महाराष्ट्रात 40 हजार कोटींची गुंतवणूक आणि 20 हजार रोजगार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नुकतेच दावोस येथे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रकल्पावर समाधान न मानता एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यात यावी अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.

| Jan 29, 2024, 17:08 PM IST

Maharashtra Jobs:नुकतेच दावोस येथे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रकल्पावर समाधान न मानता एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यात यावी अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.

1/7

महाराष्ट्रात 40 हजार कोटींची गुंतवणूक आणि 20 हजार रोजगार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra 20 thousand jobs With Nippon Steel CM Eknath Shinde announce

Maharashtra Jobs:महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत 40 हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

2/7

20 हजार रोजगार

Maharashtra 20 thousand jobs With Nippon Steel CM Eknath Shinde announce

यामुळे महाराष्ट्रातील 20 हजार नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

3/7

सह्याद्री अतिथीगृहात बैठक

Maharashtra 20 thousand jobs With Nippon Steel CM Eknath Shinde announce

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. 

4/7

एकापेक्षा अधिक प्रकल्प

नुकतेच दावोस येथे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रकल्पावर समाधान न मानता एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यात यावी अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.

5/7

लोह खाणींना जोडणारा हा प्रकल्प

Maharashtra 20 thousand jobs With Nippon Steel CM Eknath Shinde announce

राज्यातील लोह खाणींना हा जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान देणारा आहे. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

6/7

औद्योगिक विकास वेगाने

Maharashtra 20 thousand jobs With Nippon Steel CM Eknath Shinde announce

नुकत्याच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्यात सुमारे 3 लाख 53 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ यामुळे औद्योगिक विकास वेगाने होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

7/7

35 टक्के प्रकल्प महाराष्ट्रात

Maharashtra 20 thousand jobs With Nippon Steel CM Eknath Shinde announce

राज्यातील पोषक वातावरणामुळे गुंतवणुक वाढत असून महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी सुमारे 35 टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.