ब्रेन कॅन्सरची शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं; दुर्लक्ष करू नका!

Brain Cancer: ब्रेन कॅन्सरचा परिणाम फक्त मेंदूवरच नाही तर संपूर्ण शरीरावर होतो. याची सुरुवातीची लक्षणे काय आहेत यावर सविस्तर जाणून घेऊया.

| Jun 11, 2024, 13:24 PM IST
1/7

ब्रेन कॅन्सर हा मेंदूला होणारा आजार असून मेंदूच्या पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ म्हणजे ब्रेन कॅन्सर होय.

2/7

मेंदूतील या कॅन्सरच्या पेशी वाढतात आणि मेंदूच्या वेगवेगळ्या भागात पसरतात.

3/7

लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंतच्या सर्व वयोगटातील लोकांना ब्रेन कॅन्सरचा धोका असतो. ब्रेन कॅन्सरची लक्षणं काय आहे ते जाणून घेऊया.

4/7

वारंवार डोकेदुखी ही ब्रेन कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

5/7

कधीकधी एपिलेप्सिचा झटका हे ब्रेन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. यामुळे मेंदू आणि शरीरात अनेक बदल होतात.  

6/7

जेव्हा कॅन्सर टाळूमध्ये वाढतो त्यावेळी तो मेंदूच्या पेशींवर दबाव टाकतो. त्यामुळे कॅन्सर वाढू लागतो आणि ऑप्टिक नर्व्हवरही खूप परिणाम होतो.

7/7

ब्रेन कॅन्सरचा डोळ्यांवरही परिणाम करतो. ऑप्टिक नर्व्हवर दबाव आल्यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते.