शिवाली परबने अमेरिकेतून पोस्ट केले Bold Photos; चाहते म्हणाले, "...आई किती रागवेल शिवाली?"

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post: कल्याणची चुलबुली शिवाली परब अशी ओळख असलेली ही अभिनेत्री सध्या अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांचे दौरे करत आहे. अमेरिकेमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिवालीने पोस्ट केलेल्या या हॉट फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काहींना मोना डार्लिंग आठवलीय तर काहींनी थेट आई ओरडेल असंही शिवालाला 'हे खरंय' का म्हणत विचारलं आहे. शिवालीने पोस्टला दिलेली कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. पाहूयात शिवाली नेमकं काय म्हणाली आहे...

| Jul 18, 2023, 11:49 AM IST
1/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे शिवाली परब. कल्याणची शिवाली परब अशी ओळख करुन दिली जाणारी ही मराठमोळी अभिनेत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे.

2/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

खरं तर शिवाली ही सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांची कायमच कनेक्टेड असते. अगदी बर्थ डे सिलिब्रेशनपासून ते सेटवरील फोटोंपर्यंत अनेक पोस्ट ती इन्स्टाग्रामवरुन करत असते.

3/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

सोशल मीडियावर मागील काही काळात शिवालीच्या फॉलोअर्समध्ये चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. सध्या शिवालीचे 2 लाख 25 हजारांहून अधिक फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत. 

4/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

सध्या हास्यजत्रेची संपूर्ण टीमच अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये दौरे करत आहे. याच अमेरिका दौऱ्यातील काही फोटो शिवाली मागील काही दिवसांपासून शेअर करत आहे.

5/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

अमेरिकेतील या दौऱ्यांचे फोटो शिवालीबरोबर प्रियदर्शनी इंदलकर, गौरव मोरे, चेतना भट्ट, पृथ्वीक प्रताप हे अभिनेते शेअर करत असून तेथील अनुभव ते आपल्या चाहत्यांसमोर मांडताना पाहायला मिळत आहे.

6/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

मात्र शिवालीने नुकत्याच केलेल्या एका पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये शिवालीने वॉशिंग्टन डिसीमधील एक अभनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

7/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

फोटोंमध्ये शिवाली ही शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. एका सीटवर बसून शिवाली पोज देताना दिसत आहे. शिवालीचे हे फोटो पृथ्वीक प्रतापने क्लिक केल्याचं तिने फोटो क्रेडिटमध्ये म्हटलं आहे.

8/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

शिवाली या फोटोंमध्ये शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने एका पायामध्ये अँकल घातल्याचं दिसत आहे. शिवाली या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. हे फोटो लिमो या आलिशान कारमधील असल्याचं तिनेच पोस्टमध्ये म्हटलं आहे.

9/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

"आजपर्यंत बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या चित्रपटात पाहिलेल्या लिमो या कारमध्ये बसले आणि वॉशिंग्टन डिसी या शहरात फिरले. कमालीचा अनुभव होता. हा अनुभव देण्यासाठी हास्यजत्रेच्या टीमचे आभार," अशी कॅप्शन शिवालीने या फोटोंना दिली आहे.

10/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

शिवालीचे हे हॉट फोटो पाहून काही चाहत्यांनी तिचा हा अवतार म्हणजे खरी मोना डार्लिंग वाटतेय असं म्हटलंय. मोना डार्लिंग हे शिवालीने हास्यजत्रेत साकारलेलं सोशल इन्फ्यूएन्सचं पात्र असून हे फारच मॉडर्न दाखवण्यात आलं आहे. शिवालीचा हा लूक पाहून अनेकांना हे पात्र आठवल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. अन्य एकाने तर शिवालीच्या पायातील अँकलला पैंजण समजून एक पैंजण पडल्याचं म्हटलं आहे. एक पैंजण अमेरिकेत हरवून आली तर आई किती रागवेल असा मजेदार प्रश्न या चाहत्याने या पोस्टवर कमेंट करुन विचारला आहे. 

11/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

शिवाली लिमोजीन कारमध्ये बसल्याचं पाहून अनेकांनी तिला आतापर्यंतचा प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी असून तिने हे सर्व काही स्वत:च्या कष्टाने कमवल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी तिला छान सर्व गोष्टी एन्जॉय करं असं सांगितलं आहे. 

12/12

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post

शिवालीने पोस्ट केलेल्या या फोटोला 20 हजारच्या आसपास लाईक्स आहेत. अनेकांनी शिवाली इथपर्यंत तिच्या मेहनतीच्या जोरावर पोहोचली असून कल्याणची शिवाली आता वॉशिंग्टनची झाल्याचं म्हणत या गुणी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.