PHOTO: मुंबईतल्या कोस्टल रोडचे एरियल फोटो पाहिलेत का?

Mumbai Coastal Road PHOTO: मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. उद्यापासून मुंबईकरांना या मार्गावरून प्रवास करता येणाराय.

| Mar 12, 2024, 16:35 PM IST
1/10

मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी 10.58 कि.मी. आहे. या मार्गामुळे  70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये 34 टक्के बचत होईल

2/10

'कोस्टल'मुळे रोजच्या प्रवासाचा वेळ 10 ते 15 मिनिटांनी कमी होणार असल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पावर एकूण 14,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

3/10

कोस्टल रोड मुंबईकरांसाठी मंगळवारपासून खुला करण्यात येणार आहे. या रोडवरुन आठवड्यातून पाच दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच प्रवास करता आहे. शनिवारी आणि रविवारी कोस्टल रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. 

4/10

पहिल्या टप्प्यात वरळीकडून मरिन ड्राइव्हकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला आहे. या मार्गामुळे पाउण तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत शक्य होणार आहे.  

5/10

तसेच कोस्टल रोडवर प्रवास करताना कमाल वेग ताशी 80 किलोमीटर असेल. बोगद्यात वेग मर्यादा ताशी 60 किलोमीटर आहे. वळण, प्रवेश आणि निर्गमन बिंदूंची पातळी 40 किलोमीटर प्रति तास असेल.

6/10

कोस्टल रोडवरील प्रवासादरम्यान वाहन पार्किंग करणे किंवा रस्त्यावर वाहन थांबवणे, फोटो सेशन किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असेल.

7/10

सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, जड मालवाहने (बेस्ट/एसटी बस/स्थलांतरित वाहतूक वाहने वगळता) आणि सर्व मालवाहू वाहने, तसंच दुचाकी, सायकली आणि दिव्यांग व्यक्तीच्या मोटारसायकल/स्कूटर आणि तीन चाकी वाहनांना या मार्गावर बंदी आहे.

8/10

या प्रकल्पात जलाशय रस्ते, पूल, सुधारित रस्ते यांचा समावेश आहे. कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.  तसंच संपूर्ण रस्ता टोलमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती.

9/10

कोस्टल रोडवरुन श्रेयवादाची लढाई रंगताना दिसतेय. न केलेल्या कामांचं श्रेय आम्ही घेत नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय, तर श्रेय द्यायला मन मोठं असावं लागतं.. असा टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.. 

10/10

कोस्टल रोडचं काम सुरू झालं त्यावेळी वसुलीचा सपाटाच लावण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय...ठेकेदारांनीच तक्रार केल्याचा दावा फडणवीसांनी यावेळी केला.. तर, तत्कालीन आमदारावरही त्यांनी भाषणातून निशाणा साधलाय...कोस्टल रोडच्या कामावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे...