आले तुफान किती, जिद्द ना सोडली! उद्धव ठाकरेंचा 'फोटोग्राफर ते मुख्यमंत्री' प्रवास

उद्धव ठाकरेंना त्यांच्या राजकिय कारकिर्दित अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं.

| Jul 27, 2024, 07:41 AM IST

Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंना त्यांच्या राजकिय कारकिर्दित अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं.

1/7

आले तुफान किती, जिद्द ना सोडली! उद्धव ठाकरेंचा 'फोटोग्राफर ते मुख्यमंत्री' प्रवास

Maharashtra Ex CM Uddhav Balasaheb Thackeray Education Photography to Political Career

Uddhav Thackeray Birthday: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 साली झाला. फोटोग्राफर म्हणून सुरु झालेला प्रवास त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेला. या प्रवासात त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. याचा आढावा घेऊया.

2/7

फोटोग्राफीची आवड

Maharashtra Ex CM Uddhav Balasaheb Thackeray Education Photography to Political Career

उद्धव ठाकरेंनी आपले प्राथमिक शिक्षण बालमोहन विद्यामंदिर येथून पूर्ण केले. यानंतर त्यांनी सर जे.जे कॉलेज ऑफ आर्ट्समधून पदवी पूर्ण केली. सुरुवातीपासून त्यांना फोटोग्राफीची आवड होती. 

3/7

राजकीय प्रवासाला सुरुवात

Maharashtra Ex CM Uddhav Balasaheb Thackeray Education Photography to Political Career

राजकारणात येण्यापुर्वी उद्धव ठाकरे मराठी दैनिक हिंदूमध्ये पत्रकार म्हणून नोकरीला होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी 2002 मध्ये पालिकेची निवडणूक लढवली, येथे त्यांना मोठा विजय मिळाला. येथेच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 

4/7

3 वेळा मोठा धक्का

Maharashtra Ex CM Uddhav Balasaheb Thackeray Education Photography to Political Career

2003 मध्ये ते शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष बनले.उद्धव ठाकरे यांना आपल्या कारकिर्दित 3 वेळा मोठा धक्का बसला. तिसरा धक्का इतका जबर होता की ते कोलमडतील, असे विरोधकांना वाटले. पण ते हटले नाहीत. त्यांनी नव्याने पक्षबांधणी केली आणि लोकसभेत यश मिळवून दाखवले.

5/7

ठाकरेंना मोठा धक्का

Maharashtra Ex CM Uddhav Balasaheb Thackeray Education Photography to Political Career

पक्षांतर्गत मतभेदामुळे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडली. हा पक्षासाठी मोठा धक्का होता. यानंतर 2006 साली राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. दरम्यान 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला. त्यात पक्ष आणि चिन्हही गेल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला. 

6/7

राज्यात घवघवीत यश

Maharashtra Ex CM Uddhav Balasaheb Thackeray Education Photography to Political Career

मराठी माणसांसाठी संघटना स्वरुपात काम करणाऱ्या शिवसेनेने राज्यात घवघवीत यश मिळवले. यानंतर राष्ट्रीय स्तरावरही पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. 2004 मध्ये उद्धव ठाकरेंना पक्षाचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. 

7/7

नेतृत्वावर शंका

Maharashtra Ex CM Uddhav Balasaheb Thackeray Education Photography to Political Career

बाळासाहेबांप्रमाणे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ राज ठाकरेंमध्येच आहे. उद्धव ठाकरे ते करु शकणार नाहीत, अशी शंका त्यांच्या नेतृत्वावर घेतली गेली. पण उद्धव ठाकरेंनी संयम बाळगला आणि आपल्या कर्तुत्वाने स्वत:ला सिद्ध केले.