Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी संकटात, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं
Unseasonal Rain : राज्यातील शेतकऱ्यांवर (Farmers) अस्मानी संकट कोसळलं आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर गारपीटीने (Hailstorm) उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यातच हाती आलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने सांगा जगायचं कसं असा प्रश्न विचारायची वेळ बळीराजावर आलीय. कांदा, गहु, भाजीपाला, आंबा, काजू फळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेत. पण राज्यातील विविध जिल्ह्यात शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकाचं नुकसान झालं आहे.