महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान; घराबाहेर पडण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

May 19, 2024, 13:33 PM IST
1/10

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान; घराबाहेर पडण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

Maharashtra Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी देश सज्ज झाला आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, ओडिशातील पाच, झारखंडमधील तीन आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान घेतले जाईल. 

2/10

मतदानाची वेळ

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

सोमवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्याकडे मतदान करण्यासाठी वेळ असेल. दरम्यान मतदान करायला घराबाहेर पडण्याआधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 

3/10

पाचव्या टप्प्यातील मतदान

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

पाचव्या टप्प्यातील मतदानात 695 उमेदवार जागांवर आपले नशीब आजमावत असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. पाचव्या टप्प्यासाठी 1586 उमेदवारी अर्ज आले होते. यांची तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.

4/10

मतदान हा आपला अधिकार

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

मतदान हा आपला अधिकार आहे. आपला खासदार कोण हवा? हे तुम्ही तुमचे अमूल्य मत देऊन ठरवू शकता. यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? याबद्दल जाणून घेऊया. मतदान केंद्र कसे शोधायचे? मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासायचे? अशी सर्व माहिती समजून घेऊया. 

5/10

तुमचे मतदान केंद्र कसे शोधायचे?

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

  तुमचे मतदान केंद्र शोधण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमचा EPIC क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. इलेक्शन फोटो आयडी कार्ड (EPIC) हे तुमचा मतदार आयडी म्हणून काम करते, EPIC क्रमांक हा 10 अंकी युनिक आयडेंटिफायर आहे जो कार्डच्या समोर प्रदर्शित होतो. तुमचे मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.

6/10

मतदार यादीत नाव कसे शोधायचे?

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

  मतदार यादीतील तुमचे नाव तुम्ही ऑनलाईन माध्यमातून तपासू शकता. यासाठी अधिकृत वेबसाइट electoralsearch.eci.gov.in. वर जाऊन तपासू शकता.

7/10

अधिकृत वेबसाइट

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचे राज्य आणि भाषा निवडा. नाव, मधले नाव, आडनाव, जन्मतारीख, वय, लिंग, नातेवाईकांचे नाव आणि आडनाव यासारखे तुमचे तपशील भरा. यानंतर तुमचा जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडा. आता समोर कॅप्चा कोड येईल तो प्रविष्ट करा. यानंतर 'सर्च' वर क्लिक करा.

8/10

मोबाईलच्या माध्यमातून

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

मोबाईलच्या माध्यमातून तुमचे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी. वोटर हेल्पलाइन अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. तुमची भाषा आणि राज्य निवडा. तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड भरा. 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा आणि वन-टाइम पासवर्ड टाका. आता OTP एंटर करा आणि 'Search' वर क्लिक करा.

9/10

एसएमएसच्या माध्यमातून तपासा

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

यासाठी तुम्हाला 1950 या क्रमांकावर EPIC क्रमांक एसएमएस करावा लागेल. समजा तुमचा EPIC क्रमांक 12345678 असेल तर ECI 12345678 लिहून 1950 वर पाठवायचा आहे. याव्यतिरिक्त तुम्ही https://voters.eci.gov.in/login वर जाऊन नाव तपासू शकता. तसेच प्ले स्टोअरमध्ये जाऊन वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करु शकता. 

10/10

व्हीव्हीपॅटवर स्लिप तपासा

Maharashtra Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details

मतदान केंद्रात तुम्हाला मोबाईल वापरावर बंदी असते. त्यामुळे मोबाईल नेणे शक्यतो टाळा. व्हीव्हीपॅटमधून स्लिप येईपर्यंत (७ सेकंद)  बटण दाबून ठेवा.  एक बीप असा आवाज येईल. व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरूण बोट काढू नका.  तुम्ही दिलेले मत व्हीव्हीपॅटवर स्लिप दिसत आहे का ते तपासा.