डाळीत डाळ, तुरीची डाळ... नवरीसाठी खास 10 उखाणे

Marathi Ukhane : लग्नसमारंभात किंवा इतर सोहळ्यात उखाणे घेण्याची पद्धत आहे. अशावेळी मराठीतील 10 मजेशीर अखाणे. 

महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करत असताना उखाणे घेतले जातात. अशावेळी नवरदेव आणि नवरीसाठी खास उखाणे. या उखाण्यांमध्ये काही मजेशीर उखाण्यांचा देखील समावेश आहे. 

1/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा, …..राव माझे कृष्ण मी त्यांची राधा.

2/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून, ___रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.

3/10

Marathi Ukhane

काचेच्या ग्लासात चक चक दही, …..रावांच्या अंगठीवर माझी इंग्लिश सही.

4/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

चाफा बोलेना, चाफा चालेना, ___च माझ्याशिवाय, पानच हलेना.

5/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

खान तशी माती, …..राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती.

6/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.

7/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी, ___रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी. 

8/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, ___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.

9/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

चाफ्याची कळी फुलली बागेत वास पसरला असंमतात, ….. राव नेहमीच असतात माझ्या हृदयात.

10/10

मराठी उखाणे

Marathi Ukhane

आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे, ___रावांसाठी, सोडून आले मी सारे.