आधी आमदार नंतर शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्ह... उद्धव ठाकरेंच्या हातून कसं निसटलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम

Shiv Sena : निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह व पक्षाच्या नावाच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता.

May 11, 2023, 10:50 AM IST

Shiv Sena : निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह व पक्षाच्या नावाच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता.

1/9

Shinde group vs thackeray group

21 जुलै 2023 : शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये पक्षचिन्ह आणि नावासाठी रस्सीखेच सुरु होती

2/9

Shinde group claims to have 13 MPs along with 50 MLAs

21 जुलै 2023 : शिंदे गटाने 2/3 संख्याबळासह 50 आमदारांसह 13 खासदार सोबत असल्याचा दावा निवडणूक आयोगात केला होता.

3/9

Supreme Court said will not interfere in the work of the Election Commission

21 जुलै 2023 : याबाबत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले 

4/9

EC askedShinde group to submit the documents

8 ऑगस्ट 2023 : यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

5/9

Election Commission freezes Shiv Sena bow and arrow symbol

ऑक्टोबर 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं होतं.

6/9

Byelection of Andheri East Vidhan Sabha Constituency

ऑक्टोबर 2022 : ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासाठी निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिलं होतं.

7/9

balasahebanchi shiv sena

ऑक्टोबर 2022 :  यासोबत निवडणूक आयोगाने शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल आणि तलवार हे पक्षचिन्ह दिलं होतं.

8/9

Hearing before the Election Commission begins

ऑक्टोबर 2022 : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झाली

9/9

EC awarded the name Shiv Sena to the Shinde group

17 फेब्रुवारी 2023 : यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला बहाल केले.