Devendra Fadnavis Love Story: देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांची 'ती' पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis Love Story: देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
1/7
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार असून ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. अनेकांना फडणवीस या राजकीय प्रवासाबद्दल खूप वाचले आणि ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत.
2/7
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही नेहमीच चर्चेत असतात. फडणवीस यांच्या राजकीय खेळीदरम्यान त्यांची अभिनेत्री-गायिका पत्नी अमृता यांनीही त्यांची कारकीर्द कायम राखली. पण राजकारणात पूर्णपणे रमलेले देवेंद्र आणि चकचकीत जगाशी नातं जोडलेली अमृता यांची भेट कशी झाली? ते 90 मिनिटे का महत्त्वाची ठरली?
3/7
अवघ्या 90 मिनिटात प्रेम झालं
देवेंद्र आणि अमृता यांचा विवाह 2005 साली झाला होता. अमृता या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ शरद रानडे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ चारुलता रानडे यांची कन्या आहे. हे दोघे भेटले तेव्हा अमृता बँकर होत्या. दोघांचीही एका कॉमन फ्रेंडच्या घरी अरेंज्ड मॅरेजसाठी ओळख झाली होती. कॉमन फ्रेंड शैलेश जोगळेकर यांच्या घरी झालेल्या या भेटीत अमृता काही काळ थांबणार होती, पण दोघांचे बोलणे सुरू असताना दीड तास कळत नकळत निघून गेला. खरे तर देवेंद्र तोपर्यंत आमदार झाले होते आणि अमृताला राजकारणावर विश्वास नव्हता.
4/7
राजकारणाची वाटत होती भीती
इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमृता यांनी सांगितलं की, 'त्यांना भेटण्यापूर्वी मी तणावात आणि दबावाखाली होते. देवेंद्र हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती असतील असा प्रश्न मला पडला होता, कारण माझ्या मनात नेत्यांबद्दल खूप नकारात्मक प्रतिमा होती. पण त्याला भेटल्यावर ही भीती नाहीशी झाली कारण तो खूप खराखुरा आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहे हे मला दिसले.
5/7