NCP Crisis : अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात कोणाचे किती आमदार?

Maharashtra Political Crisis : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे. शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) पाठिंबा देत अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पाचव्यांदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासोबत अजित पवार यांना राष्ट्रवादीतील 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे आता राज्यातील महत्त्वाच्या पक्षांमध्ये नक्की काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया.

Jul 03, 2023, 11:17 AM IST
1/10

DCM Ajit Pawar

रविवारी राजभवनात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीतील 53 पैकी 40 आमदारांचा राज्य सरकारला पाठींबा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला आहे. अजित पवारांच्या या खेळीमुळे आता राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं आहे.

2/10

Shinde group vs thackeray group

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता राज्यात आणखी दोन गट तयार झाले आहेत. सध्या राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)- अजित पवार (राष्ट्रवादी गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे गट आहेत.

3/10

maharashtra vidhan sabha

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 145 आमदारांची गरज असते. 

4/10

CM Eknath Shinde MLA

सध्या भाजपचे 106 आमदार आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर शिंदे गटाच्या एकूण 44 आमदारांनी भाजपसोबत एकत्र येत राज्यातील सरकार स्थापन केले. त्यामुळे आता शिंदे गटाकडे आता एकूण 44 आमदार आहेत.

5/10

ajit pawar chhagan bhujbal

तसेच, राज्यात राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले 53 आमदार आहेत. मात्र आता अजित पवारांसह 40 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या गटात 40 आमदार असल्याचे म्हटलं जात आहे.

6/10

sharad pawar

तर शरद पवार यांच्याकडे आता केवळ 13 आमदारांचाच पाठिबा असल्याचे म्हटले जात आहे.

7/10

uddhav thackeray

महाराष्ट्रात काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 12 आमदार आहेत. 

8/10

Vidhan sabha

तर समाजवादी पक्ष 2 आमदार, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी एक आमदार, स्वाभिमानी पक्ष एक आणि पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचा एक आमदार आहे. यासोबतच एक अपक्ष आमदार विरोधी पक्षात आहे. तर एमआयएमचे 2 आमदार आहेत.

9/10

CM DCM

सध्याच्या सरकारला भाजप 106, शिवसेना (शिंदे गट) 44, राष्ट्रवादी (अजित पवार गट)  40, इतर 21 अशा एकूण 211 आमदारांचा पाठिंबा आहे

10/10

MVA

तर कांग्रेसचे 44,  शिवसेनेचे (उद्धव गट) 12, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) 13 आणि अन्य  8 असे एकूण 77 आमदार सरकारच्या विरोधात आहेत. (सर्व फोटो - PTI)