महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचे श्रीमंत शहर! देशातच नाही तर जगात टॉपला असणाऱ्या मुंबईशी होते तुलना

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर कोणते आहे जे मुंबईला टक्कर देतेय.  

| Aug 12, 2024, 23:49 PM IST

Maharashtra Rich City : महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांचे श्रीमंत राज्य आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात हजारो शहर आहेत. यापैकी मुंबई हे सर्वात श्रीमंत आहे. हे सर्वांनाचा माहित आहे. मात्र, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर कोणते जाणून घेऊया.

1/7

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हे देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचे श्रीमंत शहर कोणते जाणून घेऊया.     

2/7

मुंबईपाठोपाठ पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले महाराष्ट्रातील दुसरे शहर आहे. सर्वात मठा आयटी हब पुण्यात आहे. यासह बजाज ऑटो, टाट मोटर्स या सारख्या बड्या कंपन्यांचे प्लांट देखील पुण्यात आहेत. पुण्याचा GDP 69 अब्ज डॉलर इतका आहे.  

3/7

पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. विद्येचे माहेर घर अशी पुण्याची ओळख आहे. 

4/7

मुंबई पाठोपाठ महराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे ते आपलं पुणे. भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत पुणे हे शहर सातव्या स्थानी आहे.

5/7

देशातील तसेच परदेशातील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत आहेत. यासह मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स ग्रुप अशा बड्या उद्योगसमूहांचे हेड ऑफिस  मुंबईतच आहेत.   

6/7

भारताच्या 10 टक्के रोजगार (Factory employment), 40 टक्के प्राप्तिकर, 20 टक्के केंद्रीय कर (Central excise), 60 टक्के आयात कर, 40 टक्के परदेशी व्यापार आणि जवळपास 40 अब्ज रुपये (9 अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. 

7/7

जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश होतो. इंटरनॅशन सिटी अशी मुंबईची ओळख आहे.  मुंबई हे शहर महाराष्ट्राचे आर्थिक केंद्रबिंदू आहे.