फोटो । मालाड येथे इमारत कोसळून 11 ठार, कुटुंब ढिगाऱ्याखाली गाढलं गेलं

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.  

Jun 10, 2021, 14:57 PM IST

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.  

1/6

मुंबईच्या मालाडमध्ये चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. त्याचवेळी जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. ( सर्व फोटो - एएनआय)

2/6

मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

3/6

मुंबईच्या मालाडमध्ये चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कुटुंबाचा अंत झाला आहे. एकाच कुटुंबातील 9 जण ठार झाले असून यात सात चिमुकल्यांचा समावेश आहे. ही दुर्घटना रात्री 11.10 मिनिटांनी घडली.

4/6

मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे मोठी दुर्घटना घडली. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. यात सात चिमुकल्यांचा अंत झाला. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

5/6

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

6/6

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. यात सात चिमुकल्यांचा अंत झाला. ( सर्व फोटो - एएनआय)