भारतातील प्रसिद्ध, पुरातन शिवमंदिरं

भारतात भगवान शंकराची मंदिरं सर्वात उत्तरी सीमा जम्मू-काश्मीरपासून ते दक्षिणेकडे तमिळनाडूपर्यंत आहेत. संपूर्ण जगभरात भोलेनाथचे भक्त आहेत. भारतातील भगवान शिवची काही मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुनाही आहेत.

Feb 20, 2020, 16:27 PM IST

संपूर्ण जगभरात भोलेनाथचे भक्त आहेत. भारतातील भगवान शिवची काही मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुनाही आहेत.

1/15

अमरनाथ

अमरनाथ मंदिर अनेक हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. हे मंदिर जम्मू-काश्मीरमध्ये आहे. दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात.

2/15

अन्नामलाई मंदिर

अन्नामलाई मंदिर तमिळनाडूतील तिरुवन्नमलई येथे आहे. या मंदिराला अरुणाचलेश्वर मंदिर या नावानेही ओळखलं जातं. हे मंदिर जवळपास २००० वर्ष पुरातन आहे.  

3/15

भवनाथ मंदिर

भवनाथ मंदिर गुजरातच्या जूनागढमध्ये आहे. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे.

4/15

भोजपुर शिव मंदिर

भोजपुर शिव मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आहे. हे मंदिर त्याच्या वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. १०३५ ई मध्ये हे मंदिर बांधलं असल्याची माहिती आहे.

5/15

दक्षेश्वर महादेव मंदिर

दक्षेश्वर महादेव मंदिर उत्तराखंडमधील हरिद्वार येथील कनखल येथे आहे. भगवान शंकराचं हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे.

6/15

कैलाशनाथ मंदिर

तमिळनाडूतील कांचीपुरममध्ये हे मंदिर आहे. दक्षिण भारतातील सर्वात शानदार मंदिरांपैकी हे एक आहे.

7/15

कंदरिया महादेव मंदिर

मध्य प्रदेशमधील खजुराहो येथे कंदरिया महादेव मंदिर आहे. खजुराहोमधील मंदिरांपैकी हे सर्वात मोठं मंदिर आहे. ९९९ ई मध्ये हे मंदिर बांधलं आहे.

8/15

केदारनाथ

केदारनाथ मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हिंदू धर्मातील उत्तराखंडमधील चार धामपैकी केदारनाथ एक आहे.

9/15

मल्लिकार्जुन मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैल पर्वतावर आहे. या मंदिराला 'दक्षिणेचा कैलास' असंही म्हणतात.

10/15

ओंकारेश्वर

ओंकारेश्वर मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आहे. ओंकारेश्वर नर्मदा नदीच्या काठी आहे. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.  

11/15

सोमनाथ मंदिर

गुजरातच्या काठियावाडमध्ये अरबी समुद्राच्या काठावर सोमनाथ मंदिर वसलेलं आहे. सोमनाथ मंदिरही १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.  

12/15

त्र्यंबकेश्वर मंदिर

महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी बनलेलं आहे.

13/15

तुंगनाथ मंदिर

तुंगनाथ मंदिर गढवाल, उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. तुंगनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून ३४६० मीटर उंचीवर बांधलेलं आहे.

14/15

वडकुनाथन मंदिर

वडकुनाथन मंदिर केरळ राज्यातील त्रिशूर येथे आहे. हे एक प्राचीन शिव मंदिर आहे. याला ऋषभाचलम् असंही म्हटलं जातं.

15/15

लिंगराज मंदिर

लिंगराज मंदिर भारताच्या ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर येथे आहे. लिंगराज मंदिर सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.