Mahashivratri 2023: महाराष्ट्रातील नंदी नसलेलं शंकराचं मंदिर; काय आहे यामागच कारण पाहा

Mahashivratri 2023: काही मंदिरं अशीही आहेत जिथं सहसा गर्दी कमी असते, पण ही प्राचीन मंदिरं पाहण्याचा योग आल्यास तुम्ही ती संधी टाळू नका....   

Feb 17, 2023, 13:56 PM IST

Mahashivratri 2023: शंकर.... सृष्टीचा निर्माता. देवादिदेव, सदाशिव, भोळा सांब अशी अनेक नावं जेव्हाजेव्हा शंकराचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा घेतली जातात. अशा या भगवान शंकराची अनेक मंदिरं देशात आणि महाराष्ट्रात आहेत. जिथं वर्षभर भाविकांची ये-जा सुरुच असते. (Maharashtra shiva templs)

1/6

bhimashankar

Mahashivratri 2023 Maharashtra offbeat Shiva temple mahabaleshwar kopeshwar kunkeshwar read details

पुण्यातील भीमाशंकराचं मंदिरसुद्धा तितकंच प्राचीन आणि रेखीव आहे. इथं येण्यासाठी रानवाटेचा थरारक मार्गही तुम्ही निवडू शकता.   

2/6

harishchandreshwar

Mahashivratri 2023 Maharashtra offbeat Shiva temple mahabaleshwar kopeshwar kunkeshwar read details

हरिश्चंद्र गडावर जाण्याची संधी मिळाल्यास तिथं असणाऱ्या हरिश्चंद्रेश्वराच्या केदारेश्वर गुफेला नक्की भेट द्या. इथं 5 फूट उंचीचं प्राचीन शिवलिंग पाहायला मिळतं. बर्फाइतक्या थंड पण्यानं वेढलेल्या या शिवलिंगाच्या बाजूंना चार खांब आहेत. हे खांब म्हणजे चार युगं आहेत अशी मान्यता आहे.   

3/6

mahabaleshwar

Mahashivratri 2023 Maharashtra offbeat Shiva temple mahabaleshwar kopeshwar kunkeshwar read details

महाबळेश्वरला तुम्ही फिरण्याच्या निमित्तानं जात असाल तर, एकदा इथल्या महाबळेश्वर शंकर मंदिराला नक्की भेट द्या. बाहेर सूर्य आग ओकत असताना इथल्या मंदिरात मात्र प्रचंड गारवा आणि निस्सिम शांतता जाणवते.   

4/6

trimbakeshwar

Mahashivratri 2023 Maharashtra offbeat Shiva temple mahabaleshwar kopeshwar kunkeshwar read details

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचं मंदिर हे पुरातन आहे. या प्राचीन मंदिराचं स्थापत्य नजर रोखणारं आहे. 

5/6

Kopeshwar

Mahashivratri 2023 Maharashtra offbeat Shiva temple mahabaleshwar kopeshwar kunkeshwar read details

कोल्हापूरातील नरसोबाच्या वाडीपासून 22 किमी अंतरावर असणारं हे आहे कोपेश्वराचं मंदिर. साधारण 1700 वर्षांपूर्वीचं हे मंदिर महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात नंदी नाही ही महत्त्वाची बाब. असं म्हणतात की देवी सती वडिलांकडे नंदी या शंकराच्या वाहनावरून गेली होती. त्यामुळं त्यावेळी तिथं शंकरासोबत नंदी नव्हता. इथं नंदीसाठी वेगळं मंदीर आहे. कोपेश्वर मंदिरात दोन शिवलिंग आहेत.   

6/6

Kunkeshwar

Mahashivratri 2023 Maharashtra offbeat Shiva temple mahabaleshwar kopeshwar kunkeshwar read details

कोकणातील समुद्रकिनारी स्थिरावलेलं हे आहे श्री देव कुणकेश्वर मंदिर. साधारण 70 फूट उंच हे मंदिर अनेकांसाठी आकर्षणाचा विषय.