धोतर आणि कुर्ता... इतका साधा लूक; तरीही Jr NTR च्या लग्नात का झाला 100 कोटींचा खर्च?

Most Expensive Wedding: सध्या वेडिंग सीजन सुरु आहे आणि बॉलिवूडमध्ये पण आपण पाहतोय की नुकतेच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि पत्नी नताशानं (Natasa Stankovic) पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. तर त्या आधी अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रानं (Sidharth Malhotra) लग्नगाठ बांधली होती. त्यांनी ग्रॅंड वेडिंग केली आहे. लग्नापासून रिसेप्शनपर्यंत सगळ्याच गोष्टी खूप ग्रँड होत्या. पण तुम्हाला माहितीये का की चित्रपटसृष्टीतील कोणत्या कोणत्या कलाकारांना ग्रँड वेडिंग केली?

Feb 17, 2023, 11:08 AM IST
1/5

Most Expensive Wedding Jr NTR

आजही जर आपण भारतातील सर्वात महागड्या लग्नांबद्दल बोलायचे झाले तर ज्युनियर एनटीआरचे नाव सर्वात वर येते. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ज्युनियर एनटीआरचे नाव कसे काय? कारण त्याच्या लग्नाचे बजेट हे 10 ते 20 कोटी नाही तर 100 कोटी होते, असे म्हटले जाते. 

2/5

Most Expensive Wedding Jr NTR

हे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडले ज्यामध्ये वर NTR ने साधे पारंपारिक धोती-कुर्ता परिधान केला होता. असे असूनही या लग्नाच्या बजेटने सर्वांनाच हादरवून सोडले. ज्युनियर एनटीआरच्या पत्नीचे नाव लक्ष्मी प्रणती आहे, जिच्या लग्नातील लूकने सर्वांचे डोळे पाणावले. रिपोर्ट्सनुसार, नववधूने परिधान केलेल्या साडीची किंमत 1 कोटी असल्याचे म्हटले जाते.

3/5

Most Expensive Wedding Jr NTR

रिसेप्शनमध्येही वधू-वरांचा लूक भव्य होता. एनटीआरनं पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती तर त्यासोबत सोन्याचे वजनदार दागिने परिधान केले होते. तर त्याच्या पत्नीनं कांजीवरम साडी नेसली होती. हा एकमेव विवाह होता ज्यामध्ये दोन्ही बाजूचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांव्यतिरिक्त एनटीआरचे चाहतेही सहभागी झाले होते.

4/5

Most Expensive Wedding Jr NTR

लग्नाला 3000 पाहुण्यांशिवाय 12 हजार चाहत्यांनीही हजेरी लावली होती. याशिवाय लग्नाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

5/5

Most Expensive Wedding Jr NTR

 2011 साली झालेल्या ज्युनियर एनटीआरच्या लग्नाची आजही चर्चा होते. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले असले तरी देखील एनटीआरच्या लग्नाची सगळ्यात जास्त चर्चा होती.