आरारारा... खतरनाक! महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारचा लुक पाहून असंच म्हणाल

2022 मध्ये महिंद्रा कंपनीने  इलेक्ट्रिक कारची घोषणा केली होती. सध्या या  इलेक्ट्रिक कारचे टेस्टिंग सुरु आहे. 

Jun 11, 2023, 18:14 PM IST

Mahindra BE.05 Electric SUV: भारतीय ऑटो कंपनी महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारचा फस्ट लुक समोर आला आहे. या करचे डिजाईन एकदम डॅशिंग आहे. या कारचा लुक एकदम रॉयल वाटत आहे. लवकरच  Mahindra BE.05 Electric SUV लाँच होणार आहे. आकर्षक लुकसह या करमध्ये सर्व एडव्हान्स आणि जबरदस्त फिचर्स असणार आहेत. 

1/10

महिंद्रा XUV.e8 डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च होणारी पहिली इलेक्ट्रिक कार असेल. यानंतर एप्रिल 2025 मध्ये Mahindra XUV.e9 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये BE.05 भारतीय बाजारपेठेत लाँच होतील.

2/10

या कारमध्ये माउंटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, प्रीमियम साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, व्हेंटिलेटेड सीट्स, लेदर अपहोल्स्ट्री, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय BE.05 मध्ये 5G नेटवर्क सपोर्टही उपलब्ध असेल. 

3/10

कंपनीचे सीईओ राजेश जेजुरीकर यांनीही BE.05 चे इंटीरियरचे फोटो शेअर केले आहेत. 

4/10

कार पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 450 किमी अंतर कापेल.

5/10

महिंद्रा बॉर्न-इलेक्ट्रिक एसयूव्ही कारमध्ये 60kWh ते 80kWh पर्यंतचा बॅटरी पॅक आहे. 

6/10

महिंद्रा बॉर्न-इलेक्ट्रिक एसयूव्ही INGLO प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली जात आहे. 

7/10

नवीन कारच्या बॉडी पॅनेलिंगला कट आणि क्रीज आहेत. 

8/10

डॅशिंग लुकमुळे ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

9/10

 महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक SUV रोड टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा पहायसा मिळाली. 

10/10

 महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कार XUV.e8 आणि XUV.e9, तर BE.05, BE.07 आणि BE.09 BE हे मॉडेल्स लवकरच लाँच होणार आहेत.