Mahindra ची सर्वात स्वस्त SUV Scorpio s3+ कार लाँच

Feb 14, 2021, 13:07 PM IST
1/5

किती आहे Scorpio S3+ ची किंमत

किती आहे Scorpio S3+ ची किंमत

Scorpio S3+ वॅरिएंटची पुण्यात एक्स शोरूमची किंमत फक्त 11.67 लाख रुपये आहे. ही किंमत हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस, टाटा हैरियर आणि एमजी हेक्टरच्या बेस वैरिएंटपेक्षा कमी आहे. तर दिल्लीत एक्स-शोरूमची किंमत 11.99 लाख रुपये  सुरू केला आहे.

2/5

स्कॉर्पियो S3 प्लस मध्ये असणार खास फीचर

स्कॉर्पियो S3 प्लस मध्ये असणार खास फीचर

कारमध्ये वन टच लेन इंडीकेटर, ऑटो डोर लॉक, सेंट्रल लैंप, साइड आणि रिअर फुट स्टेप्स, सेंट्रल लॉकिंग आणि रिअर डेमीस्टर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच डुअल फ्रंट एयरबॅग्स, रिअर पार्किंग सेंसर्स, एबीएससोबत  ईबीडी  आणि पावर स्टीयरिंग सारखे फीचर्स आहेत. 

3/5

सीटिंग ऑप्शन देखील उपलब्ध

सीटिंग ऑप्शन देखील उपलब्ध

S3+च्या बेस मॉडेलमध्ये सिल्वर स्टील रिम, एलईडी टेल लॅम्प्स, फ्रंट यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि मॅनुअल ORVMsसारखे फिचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये  7 आणि 8 सीटरचा पर्याय उपलब्ध आहे. या वॅरिएंटमध्ये लुक आणि डिजाइनमध्ये उपलब्ध आहे. 

4/5

कारमध्ये मिळणार 5-स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन

कारमध्ये  मिळणार  5-स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन

या कारमध्ये जुना 2.2 लीटरचे mHawk डीजल इंजन मिळणार आहे.  120 PS ची पावर आणि 280 NM का टॉर्क देण्यात आला आहे. यामध्ये 5-स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन मिळणार आहे. दूसऱ्या वैरियंट्समध्ये 6-स्पीड `ट्रांसमिशन देण्यात आलं आहे.   

5/5

आतापर्यंत ४ वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे Scorpio

आतापर्यंत ४ वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे Scorpio

स्कॉर्पियो आतापर्यंत ४ वेरिएंट्समध्ये उपलब्ध होत आहे. ज्यामध्ये S5, S7, S9 आणि S11 यांचा समावेश आहे. या वेरिएंट्सची किंमत 12.67 लाख रुपये ते 16.52 लाखापर्यंत आहे. ही एसयूवी तीन वेगवेगळ्या सीटिंग पर्यायासोबत उपलब्ध आहे. ज्यामध्ये 7 सीटर, 8 सीटर आणि 9 सीटरचा समावेश आहे.  आता या कार चा 5वा मॉडेल S3+ देखील लाँच झाला आहे.