महिंद्रा XUV500 या नव्या कारचे फोटो लीक, १८ एप्रिलला होणार लॉन्च
Apr 11, 2018, 14:36 PM IST
1/6
2/6
नवी XUV500 कार ६ वेगवेगळ्या प्रकारात बाजारात आणण्यात येणार आहे. ५ डिझेल मॉडेल आणि एक पेट्रोल प्रकारात असणार आहे. नव्या एसयुव्ही ६-स्पीड ऑटोमेटीक गिअर बॉक्सचा पर्याय देण्यात आलाय. मात्र, कंपनीने या नव्या कारची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, ही कार महागडी असण्याची शक्यता आहे.
TRENDING NOW
photos
3/6
कंपनीने XUV500 मध्ये नवीन इंजिन दिले आहे. आता ही यूसयूव्ही २.२ प्रति लीटर डिझेल इंजीन असेल.१५५ एचपी पॉवर आणि ३६० न्यूटन मीटरचा टॉर्क जेनरेट करु शकता. कंपनीने यात ईव्हीजीटी तंत्रज्ञाबरोबर नया टर्बोचार्जर दिलाय.
4/6
कारमध्ये नवीन बदल करताना आकर्षक मांडणी करण्यात आलेय. अंतर्गत सजावट चांगली करण्यात आलेय. ब्लॅक इंटीरिअरची मांडणी आहे. नव्या एसयूव्हीत एन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून ती अद्याधुनिक आहे. तसेच नवीन स्मार्टवॉच अॅपही देण्यात आलेय.
5/6
महिंद्राच्या नव्या XUV500 कारच्या समोर नवीन लोखंडी जाळीची चौकट देण्यात आलेय. तसेच नवीन बंपर आणि स्किड प्लेट देण्यात आलेय. एलईडी दिवे असून त्यांना आकर्षक लूक देण्यात आलाय. कंपनीने विशेष बदल केलाय.
6/6
भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी महिंद्राच्या XUV500 या कारचे नवे मॉडेल १८ एप्रिलला लॉन्च करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कंपनी बाहेर आणि आतून अनेक बदल करणार आहे. एसयूव्हीचा लूक अधिक आकर्षक असणार आहे. मात्र, ही कार लॉन्च होण्याआधीच काही फोटो लीक झालेत.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link